पाचगाव -ज्योती पाटील- : निवडणुका आटोपल्या की पक्षीय राजकारण संपवून विकासाची गोळाबेरीज सुरू होणे अपेक्षित असते. मात्र सध्या उलटे चक्र सुरू झाले असून पाचगावचे राजकारण कूरघोडीच्या मार्गाने चालले आहे. पाच वर्षे कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरू असतात. लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांच्या डोक्यात केवळ राजकारण आणि राजकारणाचा विचार असतो. मतांचे राजकारण लक्षात घेऊन विकासाचे नियोजन केले जाते. त्यामुळे असमतोल विकास महत्त्वाच्या प्रश्नांकडे स्पष्टपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पाचगावमधील पक्षीय व गटातटाच्या राजकारणातील कूरघोड्यांमुळे विकास दूर असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे दोन्ही परिणाम सामान्य माणसांवर होत आहेत.
पाचगावचा जिव्हाळ्याचा असणारा पाणी प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जिल्ह्याच्या राजकारणात अतिसंवेदनश्ील म्हणून ओळखल्या जाणाºया पाचगावमध्ये सध्या कूरघोडीच्या राजकारणाने कळस गाठला आहे. केंद्र व राज्यशासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करून घेण्यापेक्षा त्यात अडथळे आणण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यामध्ये गटातटांमध्ये वाद कायम पेटता रहात आहे.
पाचगावच्या पाणी प्रश्नावर अनेकांनी राजकारण करून आपापली राजकीय पोळी भाजून घेतल्याचे चित्र आहे. पाचगावसाठी आणलेली २२ कोटींची महाराष्टÑ जीवनर प्राधिकरणची पाणी योजना अवघ्या सहा कोटींवर आणून काम पूर्ण केले खरे; परंतु पाचगावकर अजूनही तहानलेलेच आहेत. ऐन पावसाळ्यातदेखील पाचगावकरांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पाण्यासाठीचे भिजत घोंगडे अजूनही कायम आहे. तसेच लोकप्रतिनिधींनी आढावा घेऊनही अनेक कामे मार्गी लावलेली नाहीत. गावातील अस्वच्छता, गावातील खुल्या जागांचे असणारे प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबितच आहेत. अनेक ठिकाणच्या खुल्या जागा अनेक राजकीय मातब्बरांनी ग्रामपंचायतीपासून संंबंधित प्रशासनाला हाताशी धरून गिळंकृत केल्या आहेत, हे वास्तव आहेत. त्यामागील कारणमिमांसा धक्कादायक ठरणाºया आहेत.
पाचगाव हे राजकीयदृष्ट्या सतेज पाटील गट व महाडिक गट अशा दोन्ही गटांत विभागले आहे. सध्या पाचगावच्या सरपंचपदाची धुरा महाडिक गटाकडे आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद भाजपप्रणित महाडिक गटाच्या ताब्यात आहे. आमदार भाजपप्रणित महाडिक गटाचे, खासदार राष्टÑवादीचे असले तरी महाडिक गटाचेच त्यामुळे सरपंचांपासून खासदारांपर्यंत सर्व महाडिक गटाकडे सत्ताकेंद्रे आहे. तसेच राज्यात व केंद्रांतदेखील सत्ता भाजपची म्हणजे महाडिक गटाश्ी संबंधित तरीदेखील अनेक प्रश्न प्रलंबितच का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय रहात नाही. तसेच सतेज पाटील हेदेखील एकेकाळी आमदार व मंत्री होते. सध्या ते विधानपरिषदेवर आमदार आहेत. पाचगावकरांच्या जिवांवर अनेकांनी राजकारण केले; परंतु त्याचा मोबदला पाचगावला पाहिजे तसा झाला नाही.श्रेयवादाचे राजकारण करणाºया व जनतेच्या बळावर निवडून येणाºया जनतेच्या कररूपी पैशातून विकासकामे करण्याची आश्वासने देणाºया लोकप्रतिनिधींना जागे करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.दरवेळी नवीन वायदेपाचगावच्या पाण्यासाठी दरवेळी नवीन वायदे होताना दिसत आहेत. सत्ताधारी मंडळी रोज एक वायदा जनतेच्या पदरात टाकत आहेत. वायद्याचा मुहूर्त जवळ आला की जनतेच्या अपेक्षा वाढतात; तेवढ्यात नवीन वायदा केला जातो. याविषयी तक्रारी करणारे लोक आता थकले आहेत.