कोल्हापूर : कोल्हापूरकरांना तांबडा, पांढरा आणि फुटबाॅल हंगाम जीवापाड प्रिय आहे. त्यामुळेच पेठापेठांमध्ये फुटबाॅल सामन्यावरून इर्षा रंगते. मात्र, २०१९-२०च्या फुटबाॅल हंगामात केवळ के.एस.ए.लीग आणि सतेज चषक या फुटबाॅल स्पर्धा पार पडल्या. यामुळे फुटबाॅल संघांचे अर्थिक गणित कोलमडले.
- दरवर्षी फुटबाॅल हंगामात आठ स्पर्धा होतात. त्यापैकी केवळ दोनच स्पर्धा यशस्वी पार पडल्या.
- नेताजी चषक, राजेश चषक, चंद्रकांत चषक, महासंग्राम चषक व अन्य दोन अशा आठ स्पर्धा होतात.
- वरिष्ठ संघातून खेळणाऱ्या ३२० खेळाडूंना मिळणारे मानधनाचे गणित बिघडले.
- सोळा संघातून खेळणाऱ्या राष्ट्रीय आणि परदेशी खेळाडूंसह स्पर्धांवर निर्भर असलेल्यांचा रोजगार बुडाला.
- स्पर्धा संयोजनातून मिळणारा के. एस. ए.चा महसूल बुडाला.
- महापौर चषक फुटबाॅल स्पर्धेसारखी मानाची स्पर्धा अजूनही अपूर्णावस्थेत.
- राज्यस्तरीय व अखिल भारतीय विद्यापीठीय फुटबाॅल स्पर्धाही थांबल्या.