गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदीपात्रात म्हैस धुताना पाण्याच्या प्रवाहात वाहत जावून पाण्यात गुदमरल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.मारुती बाबू चौगुले (वय ७०, रा.जरळी,ता.गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे.पोलीसातून मिळालेली माहिती अशी,शनिवारी (२६) दुपारी मारुती हे नेहमीप्रमाणे म्हैस धुण्यासाठी हिरण्यकेशी नदीवर गेले होते.म्हैस खोल पाण्यात गेल्यामुळे तिला बाहेर काढण्यासाठी ते नदीपात्रात उतरले. त्यांच्या हाकलण्यामुळे म्हैस पाण्याबाहेर आली. परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहामूळे ते बंधार्याच्या पाचव्या दरवाज्यातून वाहून पलिकडे गेले.दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पाण्यातूनबाहेर काढले. त्यावेळी ते बेशुद्धावस्थेत होते.गावातील खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले.परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.रुद्राप्पा चौगुले यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलीसात घटनेची नोंद झाली आहे. पोलीस हेडक्वॉन्स्टेबल संभाजी कोगेकर अधिक तपास करत आहेत.
जरळी येथील शेतकऱ्याचा हिरण्यकेशीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:47 PM
हिरण्यकेशी नदीपात्रात म्हैस धुताना पाण्याच्या प्रवाहात वाहत जावून पाण्यात गुदमरल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मारुती बाबू चौगुले (वय ७०, रा.जरळी,ता.गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे.
ठळक मुद्देजरळी येथील शेतकऱ्याचा हिरण्यकेशीत बुडून मृत्यूप्रवाहात वाहत जावून पाण्यात गुदमरल्याने मृत्यू