शेतीसाठी एक-आड सरी पाचट ठेवल्याने शेतीसाठी दोन-तीन टन एकरी सेंद्रिय खत प्राप्त होते. त्याचबरोबर पाण्याची व भांगलणीची ५० टक्के बचत होते. जमिनीमध्ये गारवा निर्माण होऊन पीक वाढीसाठी वातावरण अनुकूल होते. तणासाठी मजुरीभरणी यामध्ये वेळ व पैसा या दोन्हींची बचत होते. तरीही शेतकऱ्यांमध्ये असणारे अज्ञान या पाचट ठेवण्यास फाटा देत आहे. उसामध्ये पाचट ठेवल्यास उंदीर निर्माण होतात, पाला कुजत नाही. यासारखे गैरसमजाने शेतकऱ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण केले आहेत, तर उंदीरानमुळे पाल्यामध्ये साप येतात. यासारखी कारणे शेतकऱ्यांमधून सांगितली जातात. त्यामुळे ऊस तोडल्याबरोबर शेतकऱ्यांमध्ये कृषी खात्याने मार्गदर्शन व पाचट ठेवण्याचे फायदे सांगूनही शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. शासनाबरोबरच काही साखर कारखान्यांनी पाचट ठेवण्यास व ठिबक सिंचनास अनुदान जाहीर केले होते. त्यामुळे शेतामध्ये पाचट ठेवणे
शेतकऱ्यांसाठी फायदेशीरच आहे.
शेतकऱ्यांनी पाचट ठेवणे शेतीसाठी उपयुक्त
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पाचट ठेवणे शेतासाठी अत्यंत उपयुक्त असून, त्यामुळे शेतातील जमिनीमध्ये विविध सेंद्रिय घटक निर्माण होऊन जमिनीची
सुपीकता होणार आहे. त्यामुळे याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
कोट
आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रबोधन करीत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना पटवून सांगितला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने
शेती करणे सोडून आधुनिक शेती ‘व्यवसाय’ म्हणून करणे गरजेचा आहे.
- करुणा कांबळे (कृषी सहायक असळज, ता. गगनबावडा)