सतीश पाटीलनागाव/कोल्हापूर -कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन काळातील सर्वसामान्य ग्राहकांचे शेतीचे वीज बिल माफ करावे यासाठी कोल्हापूरात शिरोली पुलाचीजवळ पंचगंगा नदीपूलावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे.या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडू नका, सक्तीने वीज तोडले तर आमच्याशी गाठ आहे.सामान्य मानसाचा वीज पुरवठा बंद करू नका, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी आणि वीज अभ्यासक प्रताप होगाडे यांनी दिला.शिरोली पुलाचीजवळ पंचगंगा नदीपूलावर आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असुन दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.सरकारने दिलेलं आश्वासन पाळलेले नाही, असं म्हणत राजू शेट्टी आणि वीज अभ्यासक प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आज हे आंदोलन केले.
सरकारला फक्त अंबानीची काळजी आहे, सर्व सामान्य लोकांची काळजी नाही अशी टीका यावेळी राजू शेट्टी यांनी केली. या काळातील विज बिल माफ झालं नाही तर या पेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा शेट्टी आणि होगाडे यांनी इशारा दिला आहे.