शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

गर्दीचा जनसागर अन् ऊस दरासाठी संघर्षाची खुमखुमी; सीमा भागासह राज्यभरातील शेतकऱ्यांची हजेरी

By भीमगोंड देसाई | Published: November 08, 2023 1:26 PM

कोल्हापूर : सीमा भागासह राज्याच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीचा जनसागर, ऊस दरासाठीच्या संघर्षाची खुमखुमी, एकच गट्टी, राजू शेट्टी अशा ...

कोल्हापूर : सीमा भागासह राज्याच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीचा जनसागर, ऊस दरासाठीच्या संघर्षाची खुमखुमी, एकच गट्टी, राजू शेट्टी अशा घोषणा, बावीस दिवस आक्रोश पदयात्रेने दाखल झालेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांचे दर्शन झाल्यानंतर फुलांची प्रचंड उधळण, फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी, दरासाठी शेट्टी यांनी आदेश देताच लढण्याची खुमखुमी दाखविणारे अनेक शेतकरी, असे चित्र मंगळवारी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानात झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २२ व्या ऊस परिषदेत होते.गेल्या हंगामातील दुसरा हप्ता ४०० रुपये मिळावा, या मागणीसाठी शेट्टी यांनी २२ दिवस ५२२ किलोमीटरची पदयात्रा करत मंगळवारी ते ऊस परिषदेत सायंकाळी साडेचार वाजता दाखल झाले. लेझीम, टाळ-मृदंगाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी यासह शेतकऱ्यांनी परिषदस्थळी केलेल्या स्वागताने शेट्टी भारावून गेले होते.शेट्टी व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतरही एकसारखी घोषणाबाजी सुरू होती. शेवटी चालून, चालून आणि बोलून, बोलून माझा आवाज बसला आहे. तुम्ही आता शांता व्हा, अशी विनंती करताच सर्वत्र शांतता पसरली. काही वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर तेच माईक घेऊन बोलू लागले.

तीन स्क्रीनसमोरही मोठी गर्दीव्यासपीठावर शेट्टी येण्यापूर्वीच मैदान फुल्ल झाले होते. त्यामुळे मैदानाच्या आजूबाजूच्या रस्त्यावरच शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. वक्त्यांची भाषणे पाहता आणि ऐकण्यासाठी लावण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या तीन स्क्रीनसमोरही मोठी गर्दी होती. शेवटच्या वक्त्याचे भाषण संपेपर्यंत शेतकरी बसून राहिले.युवकांचा सहभाग लक्षणीय..परिषदेत यंदा पहिल्यांदा युवकांचा सहभाग लक्षणीय होता. छातीवर बिल्ला आणि दरासाठी लढण्याचा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

दोन लाख भाकऱ्यापदयात्रा, ऊस परिषदेसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या जेवणासाठी जिल्ह्यातून दोन लाख भाकऱ्या संकलित नांदणीत आणले होते. शेतकऱ्यांनी आणि गावांनी लोक वर्गणीतून २५ हजारांवर शेतकऱ्यांना भोजन दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने