परंतु अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हरकती घेण्यास पंधरा दिवसांचा वेळ देतो, असे सांगून पोलीस बंदोबस्तात पुन्हा काम सुरू ठेवले.
कुशिरे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की, कुशिरे तर्फ ठाणे व निगवे दुमाला या दोन गावांच्या मधून पाणंद रस्ता आहे. तो पाणंद रस्ता सेंटर धरुन शंभर फूट कुशिरेच्या हद्दीत व शंभर फूट निगवे गावाच्या हद्दीतून मापे टाकून रस्ता करण्यात यावा. पण सध्या नवीन आलेला प्लॅन व कंपनीचे लोक जी अलायमेंट दाखवत आहेत, ती अलायमेंट व प्लॅन पूर्ण चुकीचा आहे. तो प्लॅन कुशिरे येथील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे बरीचशी कुटुंबे व घरे उद्ध्वस्त होणार आहेत. कुशिरे येथील शेतकऱ्यांवर अन्याय होईल, असे काम अधिकाऱ्यांनी करू नये अन्यथा आम्ही सर्व शेतकरी व ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा कुशिरे येथील शेतकऱ्यांनी दिला.
फोटो ओळ
कुशिरे (ता. पन्हाळा) येथील शेतकरी नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या रेखांकन प्रक्रियेला विरोध दर्शविताना.
-