लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील शेतकºयांची पवनचक्की कंपनीच्या एजंटांनी नोटरीच्या नावाखाली हजारो एकर जमीन नाममात्र रुपयांत लिहून घेऊन मोठी फसवणूक केली आहे. तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र, परजिल्ह्यातील पवनचक्की कंपनीने महसूल कार्यालय, पोलीस ठाणे, निबंधक कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, आदी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून सर्वसामान्य शेतकरी यांना देशोधडीला लावले आहे. गरीब शेतकºयांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. निसर्गाने तालुक्याला वनसंपत्ती, खनिज संपत्ती, वनौषधी, उंच हवेशीर टेकड्या, सपाट जमीन, दाट जंगल, धबधबे, आदी संपत्ती बहाल केली आहे. शिक्षणाच्या बाबतीत तालुका अजून मागास आहे. तर विकासापासून वंचित आहे. हजारो एकर जमीन पडीक आहे. यामध्ये डोंगर-टेकड्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी परजिल्ह्यातील पवनचक्की कंपनीने शाहूवाडी तालुक्यातील गावागावांत एजंट नेमून गरीब शेतकºयांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून नाममात्र पैशात वकिलाकडे नोटरी करून करोडो रुपये कमविले आहेत. एका नोटरीवर शेतकºयाला पाच ते पन्नास हजार रुपये रक्कम देऊन कंपनी व एजंटांनी कोट्यवधी रुपये कमविले आहेत. अशिक्षित शेतकºयाला फक्त रजिस्टर निबंधक कार्यालयात सहीसाठी बोलावले जाते. सही करून घेतल्यावर एजंट पुन्हा शेतकºयांची गाठ घेत नाहीत. शेतकºयांनी पैशाचा तगादा लावल्यावर पोलीस ठाण्याची गरीब शेतकºयाला भीती दाखविली जाते. त्यामुळे ‘भीक नको, कुत्रे आवर’ अशी शेतकºयांची अवस्था या एजंटांनी केली आहे.
करुंगळे, आळतूर, कडवे, पुसाळे, आळतूर धनगरवाडा, पुसाळे धनगरवाडा, अमेणी, जांबूर, पेरीड, शिरगाव गावातील शेतकºयांच्या जमिनी नाममात्र किमतीत खरेदी केल्या आहेत. सध्या कडवे, पेरीड, शिरगाव, अमेणी, आळतूर, पुसाळे, आदी गावांतील हद्दीत पवनचक्की प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. पवनचक्की एजंटांनी शासकीय अधिकाºयांना हाताशी धरून गरीब शेतकºयांच्या जमिनी लाटल्या आहेत. या जमिनी स्वस्त दरात मिळतात. यामुळे मुंबई, पुणे, सातारा, आदी जिल्ह्यांतील दोन नंबरचा पैसा मिळवणाºयांनी खरेदी केल्या आहेत. आॅनलाईन सातबारामुळे न विकलेल्या जमिनी एजंटांनी परस्पर नोटरी करून विकल्या आहेत. पवनचक्की कंपनीने स्वत: वीजवाहिनीचे विद्युत खांब शेतकºयांच्या बागाईत जमिनीत मनमानी करून उभे करून शेतकºयांच्या जमिनीचे नुकसान केले आहे.एजंट मालामालपवनचक्की एजंट कालपरवापर्यंत मोटारसायकलवरून फिरत होते. आता महागड्या चारचाकी गाड्यांतून फिरत आहेत. मात्र आपली जमीन कवडीमोल किमतीला एजंटांना विकल्याच्या काळजीत शेतकरी आहेत. एजंट चारचाकी महागडी गाडी, संध्याकाळी उंची दारू घशात रिजवत आहेत.साताºयात गुन्हा दाखल१ तालुक्यातील आंबा, तळवडे, मानोली, अमेणी, शिरगाव, धनगरवाडे, तुरुकवाडी, कोतोली, कडवे, गावडी, येळवणजुगाई येथील सर्वसामान्य, गरीब, अशिक्षित अशा अनेक शेतकºयांची फसवणूक झाली आहे. गरीब शेतकºयाला वाली कोण नाही. अशाच एका फसवणूक झालेल्या शेतकºयाने सातारा पोलीस ठाण्यात एजंटाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.२ शाहूवाडी पोलीस ठाण्याकडे देखील तक्रारी दाखल झाल्या होत्या, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. पवनचक्कीसाठी जमीन खरेदी-विक्री करणाºया एजंट, मालक, पवनचक्की कंपनी, तलाठी, रजिस्टर कार्यालयातील अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.