कुरुंदवाड : शिरढोण परिसरात ११०० एकरपर्यंत जमीन क्षारपड बनली आहे. ही जमीन क्षारमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकमताने, जिद्दीने काम करण्याची दृष्टी ठेवणे गरजेचे आहे. भूमिगत निचरा प्रणाली या क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पांतर्गत अनेक जमिनी सुपीक होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहेत. श्री दत्त कारखाना व दत्त उद्योग समूह शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.
माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री दत्त उद्योग समूह व जयसिंगपूर उदगाव बँकेच्या सहकार्याने शिरढोण, राजापूर परिसरातील सुमारे १३५० एकर क्षारपड नापीक जमीन पिकाखाली आणण्यासाठी क्षारपड जमीन सुधारणा सर्वेक्षण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, प्रा. चंद्रकांत मोरे, विकास कांबळे, विश्वास बालिघाटे, अविनाश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी महेंद्र बागे, शेखर पाटील, रघुनाथ पाटील, कल्लाप्पा टाकवडे, सुरेश कोरे, अशोक टाकवडे, सुरेश सासणे, अनिल कुरणे, मनोहर शिरसे, दादा मुजगोंडा, सनी कोरबू, अशोक पाणदारे, सागर टाकवडे, डॉ. कुमार पाटील उपस्थित होते. दिलीप कोळी यांनी आभार मानले.
फोटो - १२१२२०२०-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथे दत्त उद्योग समूहाच्यावतीने क्षारपड जमीन सुधारणा सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली. यावेळी ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.