शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

शेतकऱ्यांना दाम, पोरांना काम पाहिजे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:57 AM

कोल्हापूर-मलकापूर 55 कि.मी. तानाजी पोवार । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘आवं, निवडणूक सुरू हाय; पण इकडं उमेदवारच नाय ...

कोल्हापूर-मलकापूर55 कि.मी.तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘आवं, निवडणूक सुरू हाय; पण इकडं उमेदवारच नाय तसा प्रचारबी नाय. सारी निवडणूक तिकडंच आणि कुणीबी येईना, आमच्यासाठी कुणी हाय व्हय?... ह्यो पैसंवाल्यांचा ख्योळ. त्यो मोदी येऊ दे, नायतर काँग्रेसवाले; सगळी सारखीच. आमचं शेतात जायचं चुकणार हाय काय?’ अशी प्रतिक्रिया देत एका शेतकऱ्याने भावनांना वाट करून दिली.‘लोकमत’च्या प्रतिनिधीने बसमधून प्रवास करीत हातकणंगले मतदार-संघातील बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर मार्गांवरील प्रवाशांच्या भावना जाणल्या. नोकरी मिळत नसल्याने धंदा केला; पण तोही सरकारच्या धोरणामुळे हातबट्ट्यात आल्याची प्रतिक्रिया काहींनी दिली. नव्या सरकारने तरुणांसाठी नोकºया तयार कराव्यात, अशी भावना व्यक्तकेली.येळाणे-मलकापूर येथील ज्ञानू सुतार म्हणाले, ‘इलेक्शन आली की नेत्यास्नी आमी दिसतोय; नंतर कुणी ढुंकूनबी बघत नाय. शेतकऱ्यांसाठी कुणीबी नाय, एकटा शेट्टी किती भांडणार, त्यो तरी बरं हाय बाबा.’ बांबवडे येथील बाळासाहेब पाटील म्हणाले, शेतकºयांची द्विधा अवस्था झालीय. शेतीमालाला भाव नाही, सरकारला फक्त उद्योजकच पाहिजे, असं दिसतंय. आळतूरचे शिवाजी चौगुले म्हणाले, कॉम्प्युटर-बिम्प्युटर आम्हाला माहीत नाही, शेतातलं पिकलेलं कधी विकणार? हे सरकारनं सांगावं.वाळू धोरणाचा परिणामउचगावचे वाळू व्यावसायिक संपत माने गावठी औषध आणण्यासाठी बांबवडेला जात होते. ते म्हणाले, सरकारच्या वाळू धोरणाने व्यवसायाची वाट लागली, अनेकांनी ट्रक विकले, बांधकाम व्यवसायही कोलमडला.नोटाबंदी, पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले. हाच पैसा उद्योजकांना पुरवला जातोय, तेही पैसे बुडवतात.