जयसिंगपूर : लॉकडाऊन कडक होण्याच्या भितीने भाजीपाला व फुल उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली भाजीपाल्याचे दर पाडले जात आहेत. नाशवंत असणाऱ्या भाजीपाल्यासाठी सरकारकडून कोणतेही ठोस धोरण नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
दर नसल्याने कोबी शेतातचनांदणी(ता. शिरोळ) येथील बाबासो कुगे या शेतकऱ्याने वीस गुंठ्यातील कोबी पिकाला दरच नसल्याने शेतातच तोडुन टाकला. लॉकडाऊन होणार या चर्चेमुळे सर्वत्र भाजीपाला व फळांचे दर कोसळले आहेत. याउलट ग्राहकांना चढ्या भावातच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. एका बाजुला डिझेल-पेट्रोल दरवाढ, रासायनिक खतांची दरवाढ, विज बिलांसाठी कनेक्शन तोडले जात आहेत, अशी परिस्थिती आहे.
विविध अडचणीतुन पिकविलेला शेतीमाल शिवारातच तोडून टाकावा लागत आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेताना सरकारने भाजीपाला व फुल उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करावा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल.- सागर शंभूशेटे,नांदणी.