शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

शेतकरी संघटनेचे लढाउ कार्यकर्ते अजित नरदे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 10:58 AM

जी. एम. वाण तंत्रज्ञानासाठी आग्रही असलेले आणि अन्नधान्याचे प्रखर पुरस्कर्ते तसेच शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ लढाउ कार्यकर्ते अजित नागेन्द्र नरदे (वय ६८) यांचे मंगळवारी पहाटे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचे ते बिनीचे शिलेदार होते.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अजित नरंदे यांचे निधनज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचे बिनीचे शिलेदार

कोल्हापूर : जी. एम. वाण तंत्रज्ञानासाठी आग्रही असलेले आणि अन्नधान्याचे प्रखर पुरस्कर्ते तसेच शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ लढाउ कार्यकर्ते अजित नागेन्द्र नरदे (वय ६८) यांचे मंगळवारी पहाटे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांचे ते बिनीचे शिलेदार होते.कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील अजित नरदे हे शेतकरी संघटनेत शरद जोशी यांच्यासोबत १९८0 पासून ते काम करत होते. त्यांचे वडील स्वातंत्रसैनिक होते. शेतकरी संघटनेचा कार्यकर्ताही किती अभ्यासपूर्ण असू शकतो, याचे उदाहरण म्हणून अजित नरदे यांचे नाव घेतले जाई. ते साखर डायरी साप्ताहिकाचे संपादक होते. शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख तसेच तंत्रज्ञान आघाडीचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांची शेतीविषयक काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत, अनेक साप्ताहिक-दैनिकांत त्यांनी काम केले होते, तसेच मराठीतील बहुतेक वृत्तपत्रांत शेती अर्थव्यवस्थेवर लेख लिहिले आहेत.गेल्याच आठवड्यात कोल्हापूर-सांगली रस्त्यावर जयसिंगपूर येथे दुचाकीस्वाराने ठोकरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मिरजेच्या रुग्णालयातउपचार सुरु होते, मात्र, सोमवारी त्यांची प्रकृती आणखीन खालावल्याने त्यांना कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटे उपचार सुरु असतानाच त्यांचे रुग्णालयातच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. उदगाव वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंतिम विधी होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर