कोल्हापूर : आगामी २०२१-२२ चा गळीत हंगाम तोंडावर आला असतानाही सरकारने उसाची एफआरपी जाहीर केलेली नाही. या निषेधार्थ सोमवारी रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय उपोषण केले. सरकारने दखल घेऊन एफआरपी जाहीर केली नाहीतर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी दिला.यापूर्वी केंद्र सरकार एफआरपी जाहीर करत होते. मात्र केंद्राने आता ही जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवली आहे. सरकारने आगामी हंगामातील एफआरपी जाहीर करण्यास सात महिने उशीर केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तरीही त्याची दखल घेतली नाही. सरकार आम्हाला न्याय देत नसेल तर गोरगरिबांचे उद्धारकर्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या समोर बसून सरकारच्या डोळ्यावरील झापड काढण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे ॲड. माणिक शिंदे यांनी सांगितले.सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे, तरीही सरकार निर्णय घेणार नसेल तर आगामी काळात रस्ता रोको करुन सगळी यंत्रणा ठप्प केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी टी. आर. पाटील, डॉ. प्रगती चव्हाण, अशोक जाधव, सुनील गोटखिंडे, ज्ञानदेव पाटील, ॲड. अजित पाटील, संभाजी भोसले आदी उपस्थित होते.
एफआरपीसाठी शेतकरी संघटनेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 6:50 PM
Farmer SugerFactory Kolhapur : आगामी २०२१-२२ चा गळीत हंगाम तोंडावर आला असतानाही सरकारने उसाची एफआरपी जाहीर केलेली नाही. या निषेधार्थ सोमवारी रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय उपोषण केले. सरकारने दखल घेऊन एफआरपी जाहीर केली नाहीतर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी दिला.
ठळक मुद्देएफआरपीसाठी शेतकरी संघटनेचे उपोषण आगामी हंगामातील एफआरपी जाहीर केली नाहीतर रस्ता रोको : माणिक शिंदे