शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस निवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा पोटनिवडणूक एकटी लढण्याची शक्यता
2
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
3
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
4
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
5
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
6
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
7
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार
8
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
9
"...तर मी सरन्यायाधीशांच्या पायाचे तीर्थ प्यायला तयार"; PM मोदींचा उल्लेख करत संजय राऊतांचे विधान
10
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
11
Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स
12
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
13
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
14
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
15
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
16
Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन
17
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
18
बाॅम्बच्या धमक्यांमुळे विमान प्रवासाची बोंबाबोब; DGCA प्रमुख विक्रम देव दत्त यांची उचलबांगडी
19
दिवाळीत कन्फर्म तिकीट मिळणार? प्रवाशांसाठी ५७० विशेष सेवा; गर्दी टाळण्यासाठी उपाय
20
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस

‘एफआरपी’साठी शेतकरी संघटनेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:29 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आगामी २०२१-२२ चा गळीत हंगाम तोंडावर आला असतानाही सरकारने उसाची एफआरपी जाहीर केेलेली नाही. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : आगामी २०२१-२२ चा गळीत हंगाम तोंडावर आला असतानाही सरकारने उसाची एफआरपी जाहीर केेलेली नाही. या निषेधार्थ सोमवारी रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय उपोषण केले. सरकारने दखल घेऊन एफआरपी जाहीर केली नाहीतर रस्ता राेको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. माणिक शिंदे यांनी दिला.

यापूर्वी केंद्र सरकार एफआरपी जाहीर करत होते. मात्र केंद्राने आता ही जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवली आहे. सरकारने आगामी हंगामातील एफआरपी जाहीर करण्यास सात महिने उशीर केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तरीही त्याची दखल घेतली नाही. सरकार आम्हाला न्याय देत नसेल तर गोरगरिबांचे उद्धारकर्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या समोर बसून सरकारच्या डोळ्यावरील झापड काढण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे ॲड. माणिक शिंदे यांनी सांगितले.

सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत आहे, तरीही सरकार निर्णय घेणार नसेल तर आगामी काळात रस्ता रोको करुन सगळी यंत्रणा ठप्प केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी टी. आर. पाटील, डॉ. प्रगती चव्हाण, अशोक जाधव, सुनील गोटखिंडे, ज्ञानदेव पाटील, ॲड. अजित पाटील, संभाजी भोसले आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : आगामी हंगामातील एफआरपी जाहीर करावी, या मागणीसाठी सोमवारी शेतकरी संघटनेने दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमाेर उपोषण केले. (फोटो-०५०७२०२१-कोल-शेतकरी संघटना) (छाया- नसीर अत्तार)