शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

कोल्हापुरात शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण; दोन ट्रॅक्टर, चार एकर ऊस पेटवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 11:23 IST

कसबा सांगाव : उसाच्या दराची घोषणा करण्याआधी हुपरी (ता. हात-कणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे ऊस ...

कसबा सांगाव : उसाच्या दराची घोषणा करण्याआधी हुपरी (ता. हात-कणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे ऊस भरून ट्रॅक्टर जात असताना कारदगा (ता. निपाणी) येथे नरगट्टे वस्तीजवळ संतप्त शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवून आग लावली. या आगीत दोन ट्रॅक्टर जळून खाक झाले, तर ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच ढोणेवाडीतील एका शेतकऱ्याचा ऊस जवाहर साखर कारखान्यासाठी तोड सुरू होती. त्या उसाच्या फडाला आग लावल्याने मोठे नुकसान झाले आहे.ही घटना मंगळवार, दि.७ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वा. घडली. या घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली आहे. अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखाने ऊस दर निश्चित न करताच कर्नाटक व सीमा भागात ऊस तोडणी करीत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला हरताळ फासून हुपरीच्या जवाहर प्रशासनाने सीमा भागात ऊसतोड सुरू केली आहे. सर्व वाहने कारदगाहून यळगूड मार्गे रात्री साखर कारखान्याकडे नेली जात असल्याची कुणकुण अज्ञात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना लागली. रात्री १२:३० वाजेच्या सुमारास कारदगा येथील बिरदेव मंदिरच्या मागील बाजूने नेज (ता. चिकोडी) येथून ऊस घेऊन येणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉली व एक अंगद ट्रॉलीस पन्नास ते साठ अज्ञातांनी ट्रॉलीच्या चाकावर सुलोचन टाकून पेटवून दिले. यावेळी ऊसतोड कामगारांनी तेथून पळ काढला.

दोन्हीही ट्रॅक्टर घटनास्थळी जळून खाक झाले. या वाहनांचे क्रमांक समजू शकले नाहीत, तर तळदंगे येथील प्रमोद भोजकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर क्रमांक, एमएच ०९ एफबी ६७९०, तर ट्रॉली क्रमांक केए २३, टीसी ९२८१ अडवून मशीनने तोडलेला ऊस रस्त्यावर टाकला. चारही चाकाना आणि चालक आसनावर आगी लावल्या, यावेळी चालक व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. चालकाने आग विझविल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.ढोणेवाडी येथील मनगिणी बारवाडे यांच्या उसास जवाहरची तोडणी सुरू आहे. हा राग मनात धरून अज्ञातांनी उसाच्या फडास आग लावली. या आगीत त्यांचा दोन एकर व शेजारी असलेल्या बाळासो जाधव यांचा दोन एकर ऊस जळून खाक झाल्याने त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अन्य एका ठिकाणीही ट्रॉली पेटविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीfireआग