शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

शेतकऱ्यांचा वीज वितरणशी संघर्ष पेटणार

By admin | Published: September 14, 2016 11:44 PM

वीज बिल प्रकरण : चार वर्षांची शेतपंपांची थकबाकी पोलिस बंदोबस्तात वसूल करण्याची तयारी

सुहास जाधव--पेठवडगाव -वीज वितरणच्या शेती वीजपंपांची चार वर्षांची थकबाकी तीन कोटी रुपये आहे. ही रक्कम भरण्यासाठी वीज वितरण कंपनीने संबंधित शेतकऱ्यांना थकीत बिल भरण्यासाठी तगादा लावला आहे, तर वीज खंडित करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी पळवून लावले आहे. यामुळे वीज वितरण कंपनीने पोलिसांची मदत घेऊन वसुलीचे नियोजन केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत वीज वितरण कंपनी व शेतकरी आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत.जून ते सप्टेंबर हे महिने शेतकऱ्यांच्या आर्थिक मंदीचे दिवस असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, तसेच शेतकरी संघटनेने वीज थकीत बिलासाठी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांचा निर्णय होईपर्यंत थकीत बिलांची वसुली जबरदस्तीने करू नये, अशी अपेक्षा आहे. याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष करून कारवाईचा फास शेतकऱ्यांभोवती आवळला आहे. यामुळे शेतकरी वर्ग द्विधा मन:स्थितीत आहे.जयसिंगपूर उपविभागामध्ये पाच कार्यालये कार्यरत आहेत. येथील २१,१८३ शेतकऱ्यांची शेतीपंपांची वीज बिले थकीत आहेत. त्यांच्याकडून वीज वितरण कंपनीचे २२ कोटी ९८ लाख ६३ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. या थकीत बिलांची वसुली करण्यासाठी युद्ध पातळीवर वीज वितरण कंपनीची यंत्रणा सुरू आहे. वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्यावतीने विविध पथके तयार करण्यात आली आहेत. वीजपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा देऊन वसुली करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. या नोटिसांमध्ये वीज बिलांची रक्कम न भरल्यास १५ दिवसांत विद्युत पुरवठा खंडित करणार असल्याचे नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी आहे.याबाबत रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने वीज वितरण कंपनीस वीज बिल भरणार नाही, असे पूर्वीच कळविले होते. शेतीसाठी २४ तास पूर्ण दाबाचा विद्युतपुरवठा वीज वितरण कंपनीस बंधनकारक आहे. मात्र, बारा तासांचे भारनियमन, रात्री-अपरात्री वीजपुरवठा करून शेतकऱ्यांचे वीज वितरण कंपनी नुकसान करीत आहे. वीज बिलामध्ये स्थिर, विद्युत, इंधन अधिभार, विद्युत शुल्क, आदी आकार लादून विद्युत ग्राहकांना लुबाडण्याचे काम वीज वितरण कंपनी करीत आहे. थकीत बिलावर सावकारकीसारखी पठाणी व्याज आकारणी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, असा वीज वितरण कंपनीच्या नोटिसीला खुलासा देण्यात आला आहे.इस्लामपूर (ता. वाळवा) येथे वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने तगादा लावला होता. यावेळी विभागीय जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, वितरण अधिकारी व ग्राहकांची बैठक झाली. यामध्ये विद्युतपुरवठा न तोडता कायदेशीर मार्गाने तोडगा काढावा, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. असाच निर्णय वडगाव येथेही घ्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार शेतीची वीज तोडता येणार नाही, असेही निवेदन वीज वितरण कंपनीस देण्यात आले आहेतोडग्याची गरजथकीत वसुलीसाठी शेतकऱ्यांचा कडवा विरोध पाहता वडगाव परिसरातील गावांत झाल्यामुळे वीज वितरण कंपनीने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात महावितरण कंपनी, पोलिस यांचा संघर्ष पाहावयास मिळणार आहे. याप्रश्नी दोन्ही बाजूंनी चर्चेतून तोडगा काढण्याची गरज आहे.