विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २८ मार्च २०१८ रोजी गटविकास अधिकारी, चंदगड पंचायत समिती यांना सुखदेव शहापूरकर यांच्या काळातील कामाची चौकशी केली जावी. चौकशीत अपहार आढळून आल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून शहापूरकर यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, असे कळविले होते. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांनी दोषी सरपंच व ग्रामसेवकावर विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये फौजदारी केलेली नाही. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या आदेशाची एकप्रकारे पायमल्लीच झाली आहे. त्यामुळेच सरपंच शहापूरकर आणि ग्रामसेवक अनंत गडदे यांच्यावर कारवाई करण्यासाठी कांबळे यांनी पंचायत समितीसमोर आंदोलन सुरू केले आहे.
-----------------------
* फोटो ओळी : कुदनूर (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीत शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सरपंच व ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी चंदगड पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण करताना चंद्रकांत कांबळे.
क्रमांक : ०३०३२०२१-गड-०५