शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

परभणीतील शेतकऱ्यांचे चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 5:47 PM

परभणी जिल्'तील शेतकºयांना २०१७ च्या हंगामातील सोयाबीन नुकसान देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ सुरू केल्याच्या निषेधार्थ कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर शंभरहून अधिक शेतकºयांनी बुधवारी ठिय्या मारून उपोषण सुरू केले.

ठळक मुद्देसोयाबीनची नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमककृषी मंत्रालयाकडून बैठकीचे आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

कोल्हापूर : परभणी जिल्'तील शेतकºयांना २०१७ च्या हंगामातील सोयाबीन नुकसान देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ सुरू केल्याच्या निषेधार्थ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील कार्यालयासमोर शंभरहून अधिक शेतकºयांनी बुधवारी ठिय्या मारून उपोषण सुरू केले. नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत दारातून उठणार नसल्याचा इशारा दिल्यानंतर कृषी विभागाची यंत्रणा खडबडून जागी झाली. याबाबत बुधवारी (दि. १०) बैठक घेण्याचे मंत्रालयातून लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर ठिय्या उठविला.

अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी बुधवारी दुपारी एक वाजता मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आंदोलनकर्ते व मंत्री पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्याशी चर्चा घडवून आणली. यादव यांनी मंत्री पाटील व कृषी सचिवांशी संपर्क साधला. त्यानंतर आंदोलकांबरोबर बुधवारी बैठक घेण्याचे लेखी आश्वासन कृषी मंत्रालयातून आल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन स्थगित केले. दीपक किपने, उद्धव पोळ, रामकृष्ण रोटे, भीमराव मोगले, अशोक साखरे, बाळासाहेब जमरे, राजेभाऊ राठोड, सोपान जोखर, बंडू आव्हाड, उमाजी घुमरे, बळिराव शिंदे, रामराव गव्हाणे, आदी शेतकरी सहभागी झाले होते.

विलास बाबर म्हणाले, २०१७ च्या खरीप हंगामामध्ये ७० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. महसूल विभागाच्या सर्व्हेक्षणात ४३ टक्के आणेवारी आली असताना रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा प्रशासन व कृषी विभागाशी संगनमत करून परभणी, जिंतूर, पूर्णा तालुक्यांतील मळणी व कापणीचे प्रयोग करताना शेतकºयांना अंधारात ठेवून चुकीचे उत्पन्न दाखविले. या प्रयोगावर पंच, संबंधित शेतकरी, प्रयोग करणाºया कर्मचाºयांच्या स'ा नाहीत. एकाच हस्ताक्षरात पंचनामे केले असून त्यांमध्येही मोठ्या प्रमाणात खाडाखोड केली. पाथरी, सोनपेठ, मानवत, गंगाखेड, पालम तालुक्यातील चौदा मंडळांतील उत्पन्न ३० टक्केदेखील आलेले नाही. येथील शेतकºयांनाही रास्त प्रमाणात नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत शेतकºयांनी उपोषण केले. नागपूर अधिवेशन काळात कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृषी सचिव विजयकुमार यांच्याशी बैठक झाली. यामध्ये भरपाई देण्याचे आश्वासन दिले; पण त्याची पूर्तता झाली नाही. त्यानंतर ५ सप्टेंबरला पुन्हा शिष्टमंडळाने मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुंबईत भेट घेतली. पुन्हा आश्वासन दिले; पण पदरात काहीच नाही. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी हा निर्णय घेतला. आता पुन्हा बुधवारच्या बैठकीचे आश्वासन दिले आहे; पण नुकसान भरपाई न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशारा बाबर यांनी दिला.पोलिसांचे दातृत्वशेतकरी मंगळवारी सकाळी नऊ वाजता परभणी जिल्'ातील खेड्यापाड्यांतून कोल्हापूरकडे निघाले होते. दुपारी मंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना नाष्टा-पाणी दिले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर