शिरोली : वादळी वारे आणि वळीव पावसाने शिरोली एमआयडीसीतील उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे.गुरुवारी रात्री आठ वाजता शिरोली परिसराला वळीव पावसाने झोडपले सोसाट्याचा वादळी वार्यामुळे शिरोली एमआयडीसी मध्ये असलेल्या कारखान्यांच्या शेडवरील पत्रे उडून गेले आहेत.मोठमोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली आहे. विजेचे बरेच खांब पडलेले आहेत.विजेच्या तारा तुटलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर शिरोली एमआयडीसीतील उद्योगांचे झाले आहे. रस्त्यावर पडलेली झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. महावितरण कर्मचार्यांचे युध्दपातळीवर काम सुरू आहे.कोरोना बरोबर वळीव पावसाचा आणि वादळी वार्यांचा मोठा फटका शिरोली एमआयडीसीला बसला आहे.या नुकसानीची पहाणी करण्यासाठी आमदार चंदकांत जाधव यांनी शिरोलीला भेट दिली आहे.तसेच स्मॅक अध्यक्ष अतुल पाटील,उद्योजक राजू पाटील, जयदत्त जोशिलकर, सुरेश चौगुले,धनंजय थोरात यांच्यासह उद्योजक एमआयडीसीत आले होते.