शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेक जागीच ठार, पुणे-बंगळुरू महामार्गावर शिये फाट्याजवळ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:19 PM

अपघातानंतर बराच वेळ जखमी रस्त्याकडेलाच पडून होते

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर शिये फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार झाले. विश्वास अण्णाप्पा कांबळे (वय ५५) आणि पंकज विश्वास कांबळे (वय २४, दोघे रा. मौजे वडगाव, ता. हातकणंगले) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी (दि. २७) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वडगावचे विश्वास कांबळे आणि त्यांचा मुलगा पंकज हे दोघे सोमवारी सायंकाळी कामानिमित्त मोपेडवरून कोल्हापुरात आले होते. काम आटोपून परत जाताना महामार्गावर शिये फाट्याजवळ त्यांच्या मोपेडला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात रस्त्यावर कोसळलेल्या दोघांच्या डोक्याला आणि तोंडाला जबर दुखापत झाली. अपघातानंतर बराच वेळ जखमी रस्त्याकडेलाच पडून होते. अपघाताची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिस घटनास्थळी पोहोचले. १०८ रुग्णवाहिकेतून दोन्ही जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मृत विश्वास कांबळे यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. उत्तरीय तपासणीनंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.कुटुंबावर काळाचा घालाविश्वास कांबळे अल्पभूधारक शेतकरी होते. पत्नी आणि दोन मुलांसह शेतीसोबत मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. अचानक काळाने घाला घातल्यामुळे बाप-लेक ठार झाले. अपघातामुळे मौजे वडगाववर शोककळा पसरली.दीड तासाने जखमी रुग्णालयातसाडेआठच्या सुमारास अपघात घडल्यानंतर सुमारे पाऊण तास दोन्ही जखमी रस्त्याकडेला पडले होते. या काळात शेकडो वाहने रस्त्यावरून गेली. मात्र, अनेकांनी केवळ डोकावून पाहण्यातच धन्यता मानल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित जखमींचे प्राण वाचले असते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू