शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
7
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
8
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
9
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
10
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
11
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
12
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
13
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
14
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
15
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
16
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
17
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
18
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
19
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
20
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन

फुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल सेरेमनी’ने नांगरे-पाटील यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 1:19 PM

पुरोगामी विचारांची जनता आणि तत्पर, प्रशासकीय कौशल्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे मी चांगले काम करू शकलो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छांची शिदोरी मला नवी आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा भावना कोल्हापूर परिक्षेत्राचे मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे व्यक्त केल्या.

ठळक मुद्देफुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल परेड’ने नांगरे-पाटील यांना निरोप कोल्हापूरची ‘शिदोरी’ नवी आव्हाने पेलण्यास उपयुक्त : विश्वास नांगरे-पाटील यांची भावना

कोल्हापूर : पुरोगामी विचारांची जनता आणि तत्पर, प्रशासकीय कौशल्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे मी चांगले काम करू शकलो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छांची शिदोरी मला नवी आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा भावना कोल्हापूर परिक्षेत्राचे मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे व्यक्त केल्या.जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित नांगरे-पाटील यांची नाशिकला पोलिस आयुक्त झाल्याबध्दल निरोप समारंभ आणि नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस गार्डनमधील या कार्यक्रमास ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘लोकमत’ चे संपादक वसंत भोसले, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक विजय जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महानगरपालिकेचे नूतन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते, तर नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक वारके यांचा सत्कार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते शाल आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला. सत्कारानंतर पोलीस दलाने नांगरे-पाटील यांना फुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल सेरेमनी’ने निरोप दिला.नांगरे-पाटील म्हणाले, ‘मी आजपर्यंत कोणत्याही ठिकाणी निरोप स्वीकारलेला नाही. वरिष्ठांकडून आदेश आला की, बॅग घेऊन पुढे निघतो. मात्र, आज कोल्हापुरातून जाताना मन भरून आले आहे. माझे मामा पोलीस दलात होते. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना, मानसिक घुसमट यांची जाणीव आहे. ही वेदनाच संवेदना समजून कोल्हापूर परिक्षेत्रात पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाला बळ देणारे उपक्रम राबविले.‘निर्भया’ पथकाच्या माध्यमातून महिला सुरक्षा, समुपदेशनाचे काम आणि गुन्हेगारी कमी करण्याचे काम करण्यात यशस्वी ठरलो.नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके म्हणाले,‘माझ्या सेवेची सुरुवात येथूनच झाली. त्यामुळे शिवशाहूंच्या कोल्हापुरात पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. नांगरे-पाटील यांनी सुरू केलेले उपक्रम, त्यांचा ‘सोशल पोलिसिंग’चा दृष्टिकोन े पुढे घेऊन जाईन.’कार्यक्रमास रूपाली नांगरे-पाटील, डॉ. सोनाली देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी माने, आदींसह मान्यवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी आभार मानले.

वडिलांचे स्वप्न साकार..मला कोल्हापुरात पोलीस अधिकारी म्हणून काम केलेले पाहणे हे वडिलांचे स्वप्न होते. विशेष पोलीस महानिरीक्षकपदी रुजू होताना ते माझ्या स्वागतासाठी कार्यालयात आले होते. त्यांचे स्वप्न साकार केल्याचे मला समाधान आहे, असे सांगताना नांगरे-पाटील भावूक झाले. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर