कोल्हापूर : निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनची सभा नुकतीच येथील अलंकार हॉलमध्ये झाली. या सभेत निवृत्त झालेले पाच पोलीस अधिकारी, २३ पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी सहकुटुंब उपस्थित होते.
निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने आयोजित निरोप समारंभात गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, अतिरिक्तपोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, तसेच सत्कारमूर्ती उपस्थित होते.
या कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्यासह अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, आर. आर. पाटील, राजेंद्र शेडे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, संजय मोरे, निवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मदन चव्हाण, उपाध्यक्ष पंढरीनाथ मांढरे, बाळासाहेब गवाणी-पाटील, प्यारे जमादार, विलास पाटोळे, नाना मोहिते, केशव डोंगरे, महादेव तराळ, बाळू पिसाळी, अरुण पाटील, आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.समारंभात बाबा चौगुले यांनी स्वागत केले, तर यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, गृह पोलीस उपअधीक्षक सतीश माने, निवृत्त पोलीस निरीक्षक प्यारे जमादार, मनोहर रानमाळे, संभाजी म्हेत्रे, रूपाली यादव यांनी मनोगत व्यक्त केले.