लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीमध्ये पात्र ठरलेल्या शेतकºयांचा उद्या, बुधवारी मुंबईत कर्जमुक्तीबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवरही प्रत्येक तालुक्यांतून दोन अशा प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन केले आहे.कर्जमाफीची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यासाठी गेले पंधरा-तीन आठवडे सहकार विभागाचे काम सुरू असून अद्याप संपूर्ण कामकाज पूर्ण झालेले नाही.अनेक जिल्ह्यांतून याद्या अपलोड न झाल्याने शेतकºयांच्या खात्यावर पैसे वर्ग कसे करायचे? असा पेच शासकीय यंत्रणेपुढे आहे. दिवाळीपूर्वी पात्र शेतकºयांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याने कोणत्याही परिस्थिती दिवाळीपूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी सहकार विभागाने कंबर कसली पण त्यात यश आले नाही. दिवाळीपूर्वी पैसे जमा केले नाही तर विरोधक आक्रमक होतील, यासाठी प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक जिल्ह्यांतून दोन लाभार्थी निवडून त्यांचा कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या दुपारी बारा वाजता सत्कार होणार आहे. जिल्हा पातळीवर प्रत्येक तालुक्यातून दोन-तीन शेतकºयांचा सत्कार होणार आहे. जिल्ह्यात बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते शेतकºयांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कर्जमुक्त शेतकºयांचा उद्या सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:38 AM