शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

रेशनकार्डवर महिला कुटुुंबप्रमुख

By admin | Published: October 09, 2015 12:52 AM

नववर्षात मिळणार स्मार्ट कार्ड : आतापर्यंत पाच लाख ४१ हजार कार्डांचे काम पूर्ण

प्रवीण देसाई --कोल्हापूर रेशनकार्डवर आता महिला कुटुंबप्रमुख होणार आहे. तिचे छायाचित्र असलेले स्मार्ट कार्ड (रेशनकार्ड) नववर्षात कार्डधारकांच्या हातात पडणार आहे. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत आठ लाख ४९ हजार २१६ पैकी पाच लाख ४१ हजार ९१८ रेशनकार्डांचे काम पूर्ण झाले असून, त्यावर महिलांचे कुटुंबप्रमुख म्हणून नाव नोंदविण्यात आले आहे. उर्वरित काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.घरातील कर्ता पुरुष या नात्याने कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाचे नाव आतापर्यंत रेशनकार्डवर होते. परंतु, आता या रेशनकार्डवर घरातील प्रथम महिला कुटुंबप्रमुख म्हणून दिसणार आहे. त्यामुळे रेशनकार्डवरील इतर सदस्यांची नावे पती, मुलगा, सून अशी नोंदविली जातील. जुलै महिन्यापासून जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून ही मोहीम सुरू केली आहे. पूर्वी महसूल व पुरवठा विभागाच्या माध्यमातून काम सुरू होते. आता त्यांच्या मदतीला अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स आल्या आहेत. त्यांना प्रति कार्डमागे पाच रुपये मोबदला दिला जाणार आहे. शहरासह ग्रामीण भागात त्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. घराघरांत जाऊन त्या संबंधितांकडून प्री-प्रिंटेड फॉर्म भरून घेत आहेत. या फॉर्ममध्ये कुटुंबप्रमुख महिलेचे नाव, निवासी पत्ता, गावाचे नाव, शहराचे नाव, रेशन दुकानाचे नाव, आधारकार्ड क्रमांक, वार्षिक उत्पन्न, आदी माहिती भरून घेतली जात आहे. यानंतर हे प्रिंटेड फॉर्म जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनकार्ड संगणकीकरणाचा ठेका मिळालेल्या क्लिक सॉफ्ट एजन्सीकडे पाठविले जात आहेत. तेथे तीनशेहून अधिक डाटा आॅपरेटर ही माहिती संकलित करून त्यांची एंट्री करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. आतापर्यंत काम पूर्ण झालेली टक्केवारी ६३.८१ इतकी आहे. गेल्या तीन महिन्यांत पाच लाख ४१ हजार ९१८ इतक्या रेशनकार्डांवर महिलांचे नाव कुटुंबप्रमुख म्हणून नोंदविण्यात आले आहे. उर्वरित तीन लाख सात हजार २९८ रेशनकार्डांचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा पुरवठा विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे नववर्षात महिला कुटुंबप्रमुख म्हणून नोंद असलेले हे रेशनकार्ड मिळण्याची शक्यता आहे.हे काम युद्धपातळीवर सुरू असून, जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन याचा पाठपुरावा केला जात आहे. महसूल, पुरवठा यंत्रणेसह रेशन दुकानदार, अंगणवाडी सेविका, महिला बालकल्याण अधिकारी यांच्या संयुक्त बैठका घेऊन सूचना दिल्या जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम सुरू असून, लवकरच हे काम पूर्ण होईल.- विवेक आगवणे,जिल्हा पुरवठा अधिकारी