राजाराम लोंढे - कोल्हापूर -यंदा जिल्ह्यात उघडझाप पाऊस असल्याने पिकांना फारसा धोका बसला नाही. मात्र, धरणात अजून तरी अपेक्षित पाणीसाठा नाही. गत तीन वर्षांच्या तुलनेत राधानगरी, तुळशी, वारणा व दूधगंगा या प्रमुख धरणातील पाणीसाठा ७५ टक्केच आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरणारे घटप्रभा धरण भरण्यास यंदा आॅगस्ट महिन्याची वाट पाहावी लागली. पावसाची अनिश्चितता पाहता मोठे व मध्यम बारा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यास सप्टेंबर उजाडण्याची शक्यता आहे. आॅगस्ट निम्मा झाला. नद्यांना साधा पूरही आलेला नाही. पावसाची प्रमुख नक्षत्रे संपल्याने आता हक्काचा पाऊस संपला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस असणाऱ्या गगनबावडा तालुक्यात ५ हजार मिलीमीटर पाऊस होतो. तिथे अडीच महिन्यांत कशीतरी २ हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे मोठे व मध्यम प्रकल्प बारा आहेत. धरण क्षेत्रातही पाऊस कमी असल्याने प्रमुख धरणे अजूनही रितीच आहेत. मागील तीन वर्षांचा आढावा घेतला तर राधानगरी धरण जुलैअखेर पूर्ण क्षमतेने भरते. यावर्षी ८१ टक्क्यांवरच आहे. तीच अवस्था तुळशी, वारणा, दूधगंगा धरणांची आहे. गत तीन वर्षांच्या तुलनेत सर्वच धरणे ७५ टक्क्यांवर आहेत. त्यामुळे धरणे भरण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडेल, असा अंदाज आहे. ७ आॅगस्टला धरणातील पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्येधरणाचे नाव२०१२२०१३२०१४२०१५राधानगरी२३६.३२२३१.३८२३४.३५१७८.१६तुळशी६६.६६९७.०९८५.२२५८.५१वारणा८७७८६९.४२८९३.१९६७४.१३दूधगंगा५५४.१६६२३.०९५९१.४०४१५.८०कासारी७०.२८५७.६३७४.३९७०.७८कडवी७१.२४७१.२४७१.२४६४.६९कुंभी५८.४७६५.१८७०.१६५६.३८पाटगाव८७.८२१०५.२४८७.९८७७.९८वीजनिर्मितीवर परिणामदूधगंगा, राधानगरी धरणातून वीजनिर्मिती केली जाते. गत तीन वर्षांत धरणे भरण्यास आॅगस्ट उजाडत असला तरी जुलैपासूनच धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू होता. यंदा मात्र अनिश्चित पावसामुळे सुरुवातीपासूनच पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवले आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे.
धरणे भरण्यास सप्टेंबर उजाडणार
By admin | Published: August 09, 2015 11:56 PM