शिरोळ : मागच्या पिढीकडून आपल्याला ही जमीन मिळाली असून पुढच्या पिढीला चांगली सुपीक जमीन देणे गरजेचे आहे. हे उद्दिष्ट ठेवून दत्त उद्योग समूह काम करीत आहे. सर्व शेतकऱ्यांनी मिळून जिद्दीने हे काम पूर्ण केल्यास त्यांच्या शेतामध्ये उत्पादन चांगले येऊन ते आर्थिक सक्षम होतील. या कामासाठी लागणारे आवश्यक ते सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.
जुगूळ (कर्नाटक) येथील भूमी अभिरुध्दी संघ जुगूळच्या वतीने ५० सभासद शेतकऱ्यांची १६० एकर क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास प्रारंभ करण्यात आला. मल्हारपंत कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी शिवगोंडा पाटील, सविता कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आण्णासाहेब रतन्नावर, विजय पाटील, अशोक पाटील, दत्तात्रय कुलकर्णी, सुधाकर गणेशवाडी, अरुण गणेशवाडी, आण्णासो पाटील, शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, शिवमूर्ती स्वामी, कीर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आनंद कुलकर्णी यांनी आभार मानले.
फोटो - २५०४२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - जुगूळ (कर्नाटक) येथे क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पास सुरुवात करण्यात आली. यावेळी गणपतराव पाटील, मल्हारपंत कुलकर्णी, शिवगोंडा पाटील, सविता कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.