शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
2
ते 'गाडीभर' पुरावे म्हणत होते, आपल्याकडे कुणी 'सुटकेसभर'ही म्हणत नाही? सरकारच्या कारभारावर पृथ्विराज चव्हाण म्हणाले...
3
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
4
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
5
धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव
6
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
7
IND vs NZ, 2nd Test : शुबमन-पंत फिट; सर्फराजही फिक्स! KL Rahul ला बसावे लागणार बाकावर
8
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
9
विधानसभा २०२४: एकाच घरात दाेन पक्ष! राणे, नाईकांच्या कुटुंबात उमेदवारीसाठी वेगळे तंबू
10
गुटख्यातून जितकी कमाई, तितकीच डाग साफ करण्यात खर्च करते सरकार; तरीही का लागत नाही बॅन?
11
Share Market : आधी घसरण मग तेजी, शेअर बाजारात चढ-उतार सुरुच; बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी वधारले
12
१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
13
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
14
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
15
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
16
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
17
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
18
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
19
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?

उत्सव तीन रंगांचा, आभाळी सजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:15 AM

कोल्हापूर : कोरोनाचे मळभ दूर सारत मंगळवारी ७२ वा प्रजासत्ताक दिन कोल्हापुरात उत्साहात साजरा झाला. झोंबणाऱ्या थंडीतही सूर्याची कोवळी ...

कोल्हापूर : कोरोनाचे मळभ दूर सारत मंगळवारी ७२ वा प्रजासत्ताक दिन कोल्हापुरात उत्साहात साजरा झाला. झोंबणाऱ्या थंडीतही सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत, देशभक्तीपर गीतांच्या वर्षावात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. नेहमीप्रमाणे जिलेबीने ताेंड गोड करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांची देवाण-घेवाण झाली. यावर्षी ध्वजारोहणाला शाळकरी बालके नसली आणि कोरोनामुळे शारीरिक अंतराचे निर्बंध असलेतरी नियमांचे पालन करत सळसळत्या उत्साहात महाविद्यालयांसह विविध संस्थांमध्ये, चौकाचौकांमध्ये नेहमीप्रमाणे तिरंगा डौलाने फडकला. शहीद जवानांसह कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. कोरोना योद्‌ध्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याला सलामी दिली गेली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी असल्याने कोल्हापुरातही ऐन प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी केल्याने आनंदाचा हा दिवस आंदोलनाचाही ठरला.

शाळा, महाविद्यालयांमध्येही ध्वजारोहण

भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल : येथे डॉ. दीप्ती चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा झाल्या. कोरोना योद्धे म्हणून सविता जीवरसकर, रश्मीकांत कवठेकर, सिकंदर कुचकोरव्ही यांचा सत्कार झाला. दहावीत यश मिळवलेले समृद्धी पाटील, हर्षिता शर्मा, शशांक गाडे यांचा सत्कार झाला. मुख्याध्यापिका ऊर्मिला शिंदे, पर्यवेक्षक रावसाहेब पाटील, माधुरी जगताप, सरोजनी यावरे उपस्थित होत्या.

जगद्‌गुरू पंचाचार्य होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय : येथे ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. सुधाकर लिमये यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष एम. जी. वालखिंडी, विश्वस्त आर. एम. जौंदाळ, प्राचार्य डॉ. राजकुमार पाटील, डॉ. हिम्मतसिंह पाटील, डॉ. एम. आर. कुलकर्णी, डॉ. सुहास पाटील, डॉ. मिलिंद गायकवाड, डॉ. फरजाना मुकादम, डॉ. सुजाता कामिरे, डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. वर्षा पाटील. डॉ. गीतांजली कोरे उपस्थित होते.

अँग्लो उर्दू हायस्कूल शिरोली : येथे ग्रामपंचायत सदस्य सलीम महात यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गणी आजरेकर, मुख्याध्यापक एम. एच. मोमीन, कादर मलबारी, आदिल फरास, अल्ताफ झांजी, मलिक बागवान, रफिक मुल्ला, पापा बागवान, जहाँगीर अत्तार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

संस्कार विद्यार्थी वसतिगृह : शाहू मिल कॉलनीतील या संस्थेत खजानिस हिंदूराव जिरगे यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, रेखाताई कांबळे, ऋषभ सांगावकर, दीपक पाटील, हर्षल सांगावकर, पवन वाळवेकर उपस्थित होते.

विकास मंदिर, दुधाळी : येथे राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षक सौरभ भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे खजानिस पापालाल नायकवडी होते. सर्वांनी हरित कायदा शपथ घेतली. कल्पना आवळे, कुसूल भोसले, अस्लम शिकलगार, कालिदास कोळी, तानाजी कवडे उपस्थित होते.

इंदिरा गांधी विद्यानिकेतन महाद्वार रोड : येथे जायंट्‌स ग्रुप ऑफ कोल्हापूर सहेलीच्या पूनम महाडिक यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. मुख्याध्यापक एम. आर. मोहिते-पाटील, पी. एम. भाट, एस. डी. सोनार, ए. पी. कांबळे, एस. डी. सोनार उपस्थित होते.

देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल : स्कूल कमिटी चेअरमन डी. एस. लडगे यांनी ध्वजारोहण केले. संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन झाले. यावेळी कोरोना योद्धे एस. आर. पाटील, ए. एस. पाटील, एस. बी. तपासे, एम. ए. आलमाने, ए. एस. वागरे, ए. एन. गुरव, आर. के. कनोजे यांचा सत्कार झाला. मानसी माने, एस. आर. भेंडे, ए. एस. वागरे, एम. बी. अंकले उपस्थित होते.

गोखले महाविद्यालय : येथे प्राचार्य डॉ. पी. के. पाटील यांनी ध्वजारोहण केले. दौलत देसाई, उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, पर्यवेक्षक एस. एन. मेरे. एन. आय. कांबळे. कॅप्टन ए. एन. बसुगडे, बी. जे. पाटील उपस्थित होते.

कळंबा गर्ल्स हायस्कूल : येथे संस्था अध्यक्ष एल. एस. सावंत यांनी ध्वजारोहण केले. मुख्याध्यापिका एस. ए. जाधव, भारती सावंत, एस. एस. आडसूळ उपस्थित होते.

श्री दत्ताबाळ हायस्कूल : येथे निष्का गांधी हिच्या हस्ते ध्वजारोहण झाले. हरित कायदा पालनाची शपथ घेतली. यावेळी पुनीत गांधी, पल्लवी देसाई, नीलेश देसाई, संदीप डोंगरे, रोहिणी शेवाळे, मुख्याध्यापक सचिन डवंग, किर्ती मिठारी, प्रणिता वर्धमाने उपस्थित होते.

समता हायस्कूल भोसलेवाडी : येथे निवृत्त विकास अधिकारी अशोक पाटील यांनी ध्वजारोहण केले. माजी महापौर भीमराव पवार, मुख्याध्यापक शशिकांत सावंत, सरदार आंबर्डेकर, सुजय देसाई, बी. व्ही. यादव, मुख्याध्यापक सुमन पाटील आदी उपस्थित हाेते.

मिलिंद हायस्कूल प्रतिभानगर : येथे नगरसेविका छाया पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन झाले. मुख्याध्यापक एम. एम. शिर्के, जाॅर्ज क्रूझ, उमेश पोवार, काकासोा पाटील उपस्थित होते.

हरिहर हायस्कूल लक्ष्मीपुरी : मुख्याध्यापिका आर. आर. पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. वसुंधरा बचाव ही शपथ घेण्यात आली.

मिस क्लार्क होस्टेल, रविवारपेठ : चेअरमन नानासाहेब माने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. प्रमिला माने, सतीश माने, राजेश माने, मुख्याध्यापिका रेश्मा शेख, शशिकांता कसबेकर, सुधाकर विणकरे, उदय कुबडे, साताप्पा साठे उपस्थित होते.

वि. स. खांडेकर प्रशाला शाहूपुरी : येथे शाळेच्या माजी विद्यार्थिनी व इनरव्हील क्लब ऑफ निपाणीच्या अध्यक्ष वैशाली वखारिया यांनी ध्वजारोहण केले. आंतरभारती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष जिनरत्न अध्यक्षस्थानी होते. एनसीसी परेड व संविधानाचे वाचन केले. मुख्याध्यापिका उषादेवी देशमुख, नेहा कानकेकर, समीर जमादार, शीला कांबळे, वंदना काशिद, सर्जेराव भोसले, जे. जी. पाटील उपस्थित होते.

ताराराणी विद्यापीठ : येथे माजी प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी ध्वजारोहण केले. सर्वांनी वसुंधरा बचाव शपथ घेतली. उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पवार, सचिव प्राजक्त पाटील, जयश्री पाटील, भारती शेळके, ए. एम. साळोखे उपस्थित होते.

नूतन मराठी विद्यालय : मुख्याध्यापक डी. ए. शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आर. एन. कुंभार, डी. जी. कारेकर उपस्थित होते.

श्रीधर सावंत विद्यामंदिर, रुईकर कॉलनी : येथे डॉ. चंद्रकांत गायकवाड यांनी ध्वजारोहण केले. उपाध्यक्ष सुमित्रा जाधव, अमर भोसले, मुख्याध्यापिका अश्विनी पाटील, मुख्याध्यापक संजय पाटील, एम. वाय. निकाडे उपस्थित होते.

विद्यापीठ हायस्कूल : सोसायटीचे खजानिस किरण रेडेकर यांनी ध्वजारोहण केले. मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार, एस. व्ही. रणनवरे, उपप्राचार्य के. पी. वायफळकर, ए. डी. कशाळकर, एन. ए. ढगे उपस्थित होते.

प्रायव्हेट हायस्कूल : येथे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मदन कुलकर्णी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी उपाध्यक्ष अरुण डोंगरे, डॉ. प्रकाश संघवी, मुख्याध्यपक एम. आर. गोरे, व्ही. एल. डेळेकर, ए. पी. चिटणीस, टी. ए. सकट, एस. आर. गाणबावले, डी. सी. पाटील उपस्थित होते. संविधान उद्देशिका वाचन व एनसीसी परेड झाली.

प्रबुद्ध भारत हायस्कूल लक्षतीर्थ : येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सचिव षण्मुखा अर्दाळकर यांनी ध्वजारोहण केले. अनिरुद्ध अर्दाळकर, मुख्याध्यापक संजय अर्दाळकर, मुख्याध्यापक पांडुरंग रामाणे, प्रशांत काळे, पी. एस. मुनसे, सुजाता पाटील, कोमल पाटील, विश्वास जगदाळे उपस्थित होते.

इंदुमती हायस्कूल : संस्थेच्या अध्यक्ष वत्सला पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुख्याध्यापिका प्रेरणा जाधव, वर्षा पाटील, शोभा कोळी, सीमा सूर्यवंशी या उपस्थित होत्या.

नेहरू हायस्कूल : येथे फारुक पटवेगार यांनी ध्वजारोहण केले. मुस्लीम बोर्डिंग चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, आदिल फरास, रफिक शेख, जहॉँगीर अत्तार उपस्थित होते.

विविध संस्थांमध्येही ध्वजारोहण उत्साहात

बालकल्याण संकुल : येथे प्रसिद्ध सर्जन डॉ. सुभाष आठले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुलींनी देशभक्तीपर गीते सादर केली. स्वागत उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर यांनी केले. आभार एस. एन. पाटील यांनी मानले. यावेळी मानद कार्यवाह पद्मजा तिवले, ज्येष्ठ विश्वस्त व्यंकाप्पा भोसले, निरंजन वायचळ, अधीक्षक एम. एम. अष्टेकर, पी. के. डवरी, टी. एस. कदम, सचिन माने, द्रैापदी पाटील, नजिरा नदाफ, मीना कडकुंद्री, स्मिता वायचळ, अश्विनी आवळे उपस्थित होत्या.

भारत को-ऑप. क्रेडिट सोसायटी शिवाजी पेठ : येथे अध्यक्ष दीपक शिंदे यांनी ध्वजारोहण झाले. उपाध्यक्ष सविता जाधव, ज्येष्ठ संचालक रघुनाथ पाटील, बाबासाेा पाटील, अनिल इंगवले, शिवाजी जाधव, अतुल कारंडे, उदय सावंत, सुमन वाडेकर, नितीन पोवार उपस्थित होते.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ संभाजीनगर : ज्येष्ठ नागरिक व फुटबॉलपट्टू उमाकांत चरापले यांनी ध्वजारोहण केले. ए. पी. शिंदे, विश्वास चौगले, प्रकाश पाटील, एस. पी. सुतार, ओंंकार जगताप, अशोक कौलगी, अक्षया माने उपस्थित होते.

कोजीमाशी पतसंस्था मंगळवारपेठ : चेअरमन कैलास सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संचालक अनिल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील, मॅनेजर नितीन शिंदे, शाखाधिकारी रमेश मेटील, ईश्वरा पाटील, दत्तात्रय गुरव उपस्थित होते.

जय हिंद विकास सेवा संस्था निगवेदुमाला : चेअरमन वसंतराव चोपडे यांनी ध्वजारोहण केले. आर. टी. जाधव, पी. एस. कांबळे, प्रकाश पाटील, सुरेश पाटील, एकनाथ दळवी, जयश्री यादव, आनंदा घुले, शिवाजी शेलार, शिवाजी पाटील उपस्थित होते.

राजर्षी शाहू तरुण मंडळ मंगळवारपेठ : ज्येष्ठ कार्यकर्ते मुकेश पोवार यांनी ध्वजारोहण केले. बाबूराव चव्हाण, जयसिंग शिंदे, अशोक पोवार, नागेश दवेरूमठ, रमेश मोरे, नंदू आहिर, सुभाष पोवार, स. ना. जोशी, नामदेव माळी, पी. आर. गवळी, भरत सावंत उपस्थित होते.

खासबाग अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी : येथे अनिता पाटील यांनी ध्वजारोहण केले. मॅनेजर सुनील टिपुगडे, सुशील पाटील, किरण खेडकर, सतीश वेल्हाळ उपस्थित होते.

कोल्हापूर तराजू को-ऑप. हौसिंग सोसायटी: येथे नंदकुमार ओसवाल यांनी ध्वजारोहण केले. उमेश बुधले, राजमल परमार, उल्हास जोशी, हेमंत गांधी, अशोक जामसांडेकर, प्रकाश चव्हाण, प्रदीप चव्हाण, भूपेश ओसवाल, कांताबाई जैन, शारदा शिंदे उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायत मार्केट यार्ड : येथे शेतकरी भूषण कदम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी हमाल पंचायतीतर्फे दिल्लीतील शेतकरी आंंदोलनास पाठिंबा दर्शविण्यात आला. कृष्णात चौगले यांच्यासह संघटना पदाधिकारी उपस्थित होते.

अवनी संस्था, जीवबाबा नाना जाधव पार्क : येथे वारणा वडगावकर यांनी ध्वजारोहण केले. स्वागत विश्वस्त संजय पाटील यांनी केले. स्कॉट कफोरा, प्रिया बासराणी, अर्चना बराले उपस्थित होते. बालगृहातील गुणवंतांचा सत्कार झाला. तायक्वान्दोंनी प्रात्यक्षिके सादर केली.

आर्य क्षत्रिय समाज : येथे शशिकांत हाेनकोळसे यांनी ध्वजारोहण केले. सतीश करजगार, नागेश गवळी, भानुदास सूर्यवंशी, उमेश बुधले, गणेश चव्हाण, मनीष माने, बाळकृष्ण सूर्यवंशी, नेहा चव्हाण उपस्थित होते.

लोकजनशक्ती पार्टी : पांजरपाेळ लाइन येथे डॉ. श्रीकांत बामणीकर यांनी ध्वजारोहण केले. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, संग्राम यादव, तकदीर कांबळे, विकी मल्होत्रा, तुळशीदास थोरात, सुशीलकुमार कोल्हटकर, चंद्रकांत माने, दिलावर वस्ताद, दिनेश परमार उपस्थित होते.

खादी ग्रामोद्योग संघ : संघाचे सचिव एस. एस. तुपद यांनी ध्वजारोहण केले. सर्वोदयी संचालक ज्येष्ठ खादीधारी सखाराम सुतार अध्यक्षस्थानी होते. अध्यक्ष सुंदर देसाई, दादासोा जगताप, सदाशिव मनुगडे, सुजय देसाई, प्राचार्य व्ही. डी. माने, सविता देसाई, गीताताई गुरव, भक्ती देसाई, नंदकुमार पाटील, अरुण रेंदाळकर, पी. के. पाटील उपस्थित होते.

चौकट

प्रजासत्ताक दिन घरोघरी साजरा करा

संविधानात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय अपेक्षित असल्यामुळे संविधान सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. माणूस म्हणून जे अधिकार संविधानाने दिले, त्यांचा उजाळा व्हावा म्हणून घरोघरी प्रजासत्ताक दिन सणाप्रमाणे साजरा केला पाहिजे, असे मत एस. के. डिगे मेमोरिअल फाउंडेशनचे सदानंद डिगे यांनी व्यक्त केले. बिंदू चौकात डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिरंगा ध्वज बिल्ला वाटप करून प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

चौकट

मोफत जिलेबी वाटप

कोल्हापूर शहरात मोफत जिलेबी वाटपाचा कोल्हापूर शहर व जिल्हा रिक्षा संघटनेचा उपक्रम याही वर्षी स्वयंभू गणेश मंदिरासमोरील स्टॉपवर झाला. आमदार चंद्रकांत जाधव यांनी याठिकाणी भेट देऊन रिक्षाचालकांच्या हाकेला धावून येण्याची ग्वाही दिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राहुल पोवार, सुरेश कुऱ्हाडे, रणजित पोवार, अजय साळुंखे, उदय पोवार, बबलू मोमीन, सनी मोमीन, शीतल सूर्यवंशी, नीलेश साळुंखे, संदीप पोवार, सुरेश चव्हाण उपस्थित होते.

चौकट राजाराम कॉलेज परिसरात वृक्षारोपण

प्रजासत्ताक दिनानिमित्त परिचय ऑफिसिअल आणि रॉबिन हूड अकॅडमीकडून राजाराम कॉलेज प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी परिचयचे निमिष खांडेकर, राजाराम कॉलेजचे प्राचार्य संजय पाठारे, अ‍ॅॅड. सुनील धुमाळ, अविनाश देशमुख, वेदांत, ओंकार, सर्वेश, आसिया, मनाली, केशवी, अर्पिता आणि रॉबिन हूड अकॅडमीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी परिचयने पेरू, अंजीर, वड अशी १३ रोपं दान करत सर्वांनी श्रमदानही केले.