कोल्हापूर : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्यावतीने या विषयावर ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ या विषयावर घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी १० ते १९ सप्टेंबर या काळातील छायाचित्र किंवा व्हिडिओ ग्राह्य धरले जातील.
यातील स्पर्धकांनी मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व, मतदारयादीत नावनोंदणी हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, घरी येणाऱ्या भाविकांमध्ये याबाबतची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवायच्या आहेत. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे याबाबत सजावटीतून जागृती करता येईल. फोटो, व्हिडिओ मूळ स्वरूपातील असावेत, त्यावर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाईन, असे अधिकचे काही जोडू नये. स्पर्धकांनी आपले फोटो आणि चित्रफीत https://forms.gle/6TxQHaKSAhZmBbQFA या गुगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.