शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
7
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
8
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
9
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
10
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
11
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
12
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
13
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
14
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
15
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
16
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
17
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
18
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
19
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
20
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'

मतदारांना बाहेर काढण्याची फिल्डिंग

By admin | Published: November 02, 2015 12:45 AM

चंद्रेश्वरमध्ये मशीनला बिघाड : शेवटच्या काही तासात २० टक्के मतदानाची नोंद

कोल्हापूर : चुरशीच्या निवडणुकीत एक - एक मतही निर्णायक ठरू शकते, या भीतीपोटी आणि जिंकण्याच्या ईर्ष्येने अनेक उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी लावलेली ‘फिल्डिंग’ यामुळे वातावरणात आलेला तणाव, अशा परिस्थितीत दुधाळी पॅव्हेलियन अंतर्गत येणाऱ्या प्रभागातील चित्र रविवारी दिवसभर पाहण्यास मिळाले. दुधाळी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्वच प्रभागत सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्रांवर रांगा दिसत होत्या तरीही या टप्प्यात मतांची टक्केवारी सरासरी १२ टक्के होती. येथे सुरुवातीला मतदान प्रक्रिया काही प्रमाणात संथपणेच चालू होती. सकाळी साडेअकरानंतर त्यामध्ये थोडी भर पडली. दुपारच्या सत्रात इतर निवडणुकांदरम्यान ढिलाई येते; पण या महापालिका निवडणुकीत हा वेग वाढला. मतदानाची टक्केवारी ३७ टक्क्यांपर्यंत पोहोचली. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या काही जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रांकडे खेचण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांची लगबग सुरू होती. त्यानुसार मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे उमेदवारांना जाणवू लागल्यानंतर कार्यकर्त्यांना मतदान न केलेल्या मतदारांना बाहेर काढण्यास सांगण्यात येत होते. त्याचा परिणाम म्हणजे दुपारी चारनंतर या केंद्रांवर गर्दी वाढू लागली. यादरम्यान दुपारपर्यंत ५३ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते, तर अखेरच्या काही तासात हा वेग वाढला आणि मतदानाची टक्केवारी सरासरी ७१.७१ टक्क्यांपर्यंत पोहोचली. प्रभाग क्रमांक ५४, चंद्रेश्वर प्रभागातील दोन क्रमांकाच्या मतदान केंद्रात बारा वाजण्याच्या सुमारास मतदान मशीनवरील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या उमेदवारासमोरील बटण काम करेनासे झाले. मतदान केंद्राध्यक्षाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ या विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी शंकर भोसले यांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर तत्काळ राखीव ठेवलेले ईव्हीएम मशीन तत्काळ या ठिकाणी जोडण्यात आले. यावेळी या मतदान केंद्रावर ८२६ इतके मतदान झाले होते. केवळ ईव्हीएम मशीन यावेळी बदलण्यात आले. या विभागांतर्गंत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ५५ मध्ये अखेरच्या टप्प्यात आपल्याच उमेदवारांला मतदान व्हावे, याकरीता उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जणू शर्यतच लागल्याचे चित्र होते, तर प्रभाग क्रमांक ४८, तटाकडील तालीम या प्रभागातील दौलतराव भोसले विद्यालयाशेजारील विभागीय क्रमांक १ कार्यालयाच्या मतदान केंद्रात मतदानासाठी लागलेली रांग जनता बझारपर्यंत पोहोचली होती. प्रभाग क्रमांक ४५,कैलासगडची स्वारी प्रभागात आपल्याच उमेदवाराला मतदान अधिक व्हावे, याकरिता जिवाचा आटापिटा करीत मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचविण्यात समर्थक मंडळी व्यस्त असल्याचे चित्र दिसत होते. प्रभाग क्रमांक ५३ , दुधाळी प्रभागात आपल्याच उमेदवाराला मतदान करावे, यासाठी मतदारांभोवती गराडाच टाकल्याचे चित्र दिसत होते. ( प्रतिनिधी )