संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. आपल्या देशावरही कोरोनाचे महाभयंकर संकट आहे. अनेक कोरोनाबाधित रुग्णांना उपचाराकरीता हॉस्पिटलमध्ये बेडची उपलब्धता नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांना उपचाराविना प्राण गमवावे लागत आहेत. गारगोटी येथील श्री. मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटीमार्फत कोरोना आजाराच्या सुरुवातीपासूनच विविध प्रकारे सामाजिक कार्य केले जात आहे. सध्याची कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच जाणीवेतून संस्थेने गारगोटी येथे आपल्या शिक्षण संकुलामध्ये ५० बेडचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारणीचे काम हाती घेतले. १३ मे २०२१ पासून कोविड केअर सेंटर सुरू करून गरजू रुग्णांना त्याचा लाभ दिला जाईल. या कोविड केअर सेंटरमध्ये दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना हॉस्पिटल बेड सुविधा मोफत दिली जाईल तसेच इतर गरीब नागरिकांनाही उपचाराच्या बिलांमध्ये सवलत दिली जाईल. या कोविड केअर सेंटरमध्ये २५ ऑक्सजिन बेड उपलब्ध असतील.
गारगोटी येथे शिक्षण संस्थेमार्फत पन्नास खाटांचे कोरोना रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:25 AM