कोल्हापूर : वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी संचारबंदी असून, अनेक जण विनाकारण फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत २ लाख २७ हजारांचा दंड वसूल केला. त्यासोबतच १७५ वाहने जप्त केली.
संचारबंदी असूनही शुक्रवारी अनेक जण विनाकारण फिरत आहेत. त्यांच्यावर जरब बसावी. कोरोना संसर्गाची ‘ब्रेक द चेन’च्या अंमलबजावणीमध्ये नाकाबंदीदरम्यान कारवाई केली. यात विविध ठिकाणांवरून १७५ वाहने जप्त केली, तर १,२१५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करीत १ लाख ६७ हजारांचा, तर मास्क नसलेल्या २४९ जणांवर ५९ हजार ९००, असा एकूण २ लाख २७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. अशा पद्धतीची कडक कारवाई यापुढेही केली जाणार आहे. तरी नागरिकांनी विनाकारण फिरू नये, असे पोलीस दलाने आवाहन केले आहे.