शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

Kolhapur: शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात विनय कोरेंचे पुन्हा चांगभलं की सरुडकर वचपा काढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 4:13 PM

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत सलग दोनवेळा पराभव झालेल्या माजी आमदार सत्यजित पाटील (सरूडकर) ...

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत सलग दोनवेळा पराभव झालेल्या माजी आमदार सत्यजित पाटील (सरूडकर) यांनी महाविकास आघाडीतून पुन्हा एकदा जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांचा विरोधात दंड थोपटल्याने शाहूवाडी-पन्हाळा विधानसभेत पारंपरिक लढत होणार असल्याचे चित्र सध्यातरी आहे.राज्याच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडी विरुध्द महायुती असे राजकारण असले तरी शाहुवाडी-पन्हाळ्यातील राजकीय स्थिती वेगळी आहे. स्थानिक विरोध म्हणून आघाडीतील उमेदवाराला काँग्रेस नेत्यांचा तर युतीच्या उमेदवाराला अजित पवार गटाच्या नेत्यांचा विरोध असल्याने आघाडीचा धर्म नेत्यांकडून धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे.गत निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नसल्याने त्याचा फायदा कोरेंना झाला. लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील काँग्रेसच्या नेत्यांनी आघाडी धर्म पाळला नसल्याचा आरोप उध्दवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्षष्ट केली नसली तर मतदारसंघातील एका महिलेसह तीन नेत्यांनी शेट्टी यांच्याकडे उमेदवारीची मागणी केल्याचे समजते. मतदारसंघात निर्णायक मतदान असलेले स्वाभिमानी आणि वंचित आपला उमेदवार देणार की तटस्थ राहून लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढणार, हा येणारा काळ ठरवेल.

गायकवाड, पाटील कोरेंच्या पाठीशीकाँग्रेस नेते कर्णसिंह गायकवाड आणि अमर पाटील यांचा सत्यजित पाटील यांना विरोध असून, याची कोरेंना मदत होणार आहे. अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) आणि मानसिंगराव गायकवाड यांचा मुलगा रणवीरसिंह गायकवाड यांचा विनय कोरेंना विरोध, तर सत्यजित पाटील यांना उघड पाठिंबा आहे. त्यामुळे सत्तेच्या राजकारणात कितीही आघाड्या झाल्या तरी मतदारसंघात नेत्यांत बिघाडी असल्याचे चित्र आहे.

कोडोलीचे जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षकोडोलीचे डॉ. जयंत पाटील यांच्याही उमेदवारीची चर्चा असून पाटील बंडखोरी करणार की पक्षातून हे अजून अस्पष्ट आहे.  याबाबत पाटील यांनी अद्याप उमेदवारीबाबत भाष्य केलेले नाही. किती दिवस दुसऱ्याच्या वळचणीला राहून राजकारण करायचे, असा मुद्दा उपस्थित करत संजयसिह गायकवाड गटाने लढण्याची तयारी केली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य योगीराज गायकवाड यांचे नाव बैठकीत पुढे करण्यात आले आहे. 

२०१९ चा निकाल

  • विनय कोरे १,२४,८६८
  • सत्यजित पाटील ९७,००५

सध्याचे मतदार

  • एकूण मतदार ३,०२,७८०
  • पुरुष १,५५,७९५
  • महिला १,४६,९७८
  • इतर ७
टॅग्स :kolhapurकोल्हापूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४shahuwadi-acशाहूवाडीVinay Koreविनय कोरेSatyajit Patilसत्यजित पाटील