शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सन्मानाने आघाडी करा, नाही तर स्वबळावर लढू, ‘शेकाप’च्या जिल्हा बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 1:25 PM

धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही; पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने सोबत घ्यावे. दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही कुणासमोर माना खाली घालणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे, असा निर्धार माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केला. याला उपस्थितांनी हात उंचावून पाठिंबा दर्शविला.

ठळक मुद्दे सन्मानाने आघाडी करा, नाही तर स्वबळावर लढू, ‘शेकाप’च्या जिल्हा बैठकीत निर्णयविधानसभेच्या पाच जागांवर दावा

कोल्हापूर : धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही; पण काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करताना सन्मानाने सोबत घ्यावे. दहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ लढविण्याची आमची तयारी आहे. आम्ही कुणासमोर माना खाली घालणार नाही, प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे, असा निर्धार माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केला. याला उपस्थितांनी हात उंचावून पाठिंबा दर्शविला.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंबे रोडवरील शेकापच्या कार्यालयात रविवारी दुपारी जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा झाला. यात काँग्रेसप्रणित आघाडीत सहभागी होण्यासह स्वतंत्र लढण्याबाबतही चाचपणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासो देवकर, प्राचार्य टी. एस. पाटील, भारत पाटील, अशोकराव पवार-पाटील, बाबूराव कदम, केरबा पाटील, निवास लाड, बाजार समिती संचालक अमित कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासो देवकर म्हणाले, शेकाप सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलने उभारते, ती यशस्वीही करते; पण निवडणुकीच्या मैदानात मात्र यश मिळत नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. निवडणूक जिंकण्याच्याच दृष्टीने रणनीती आखली गेली पाहिजे. भारत पाटील यांनी शेकाप सध्या जिंकण्याच्या नसल्या तरी पाडण्याची भूमिका चांगली निभावू शकतो, याचे प्रत्यंतर यापूर्वीही आलेले आहे. त्यामुळे आघाडीत शेकापला सन्मान मिळावा, अशी भावना व्यक्त केली. केरबा जाधव, कुमार जाधव, सुभाष सावंत यांनी कार्यकर्ते हीच ‘शेकाप’ची ताकद असल्याने त्यांचा सन्मान राखला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. काँग्रेससोबतचा पूर्वानुभव वाईट असल्याने त्याचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

करवीरसाठी आग्रह, शाहूवाडी-पन्हाळा लढण्याची तयारीपारंपरिक मतदारसंघ म्हणून करवीरवर ‘शेकाप’चाच पहिला हक्क आहे. आघाडीच्या जागावाटप बैठकीत करवीरसाठी आग्रह कायम असणार आहे. शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादीने लढण्यास नकार दिला, तर अग्रहक्काने या जागेवर शेकापचाच विचार व्हावा, तसा उमेदवार आमच्याकडे आहे. तो योग्य वेळी बाहेर काढू, असे भारत पाटील यांनी सांगितले.बापूंकडे निर्णयाचे सर्वाधिकारदोन्ही काँग्रेससोबत आघाडी करण्यासह जागावाटपासंदर्भात सर्वाधिकार संपतबापू पवार पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय मेळाव्यात झाला. ‘शेकाप’ने दावा केलेल्या पाचपैकी किमान दोन तरी जागा पदरात पाडून घ्याव्यात, असेही ठरले. तीन आॅगस्टपर्यंत हा निर्णय होणार असल्याने तत्पूर्वी तालुकानिहाय बैठका घेऊन सक्षम उमेदवारांचा शोध घेण्याचेही ठरले.‘शेकाप’ने दावा केलेले मतदारसंघकोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी-भुदरगड, शाहूवाडी-पन्हाळा.

 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण