शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

‘बुद्ध गार्डन’मध्ये माजी नगरसेवकांसह नवख्यांमध्ये लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:04 AM

विद्यमान नगरसेवक : वहिदा सौदागर आताचे आरक्षण : अनुसूचित जाती संतोष मिठारी, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गेल्या निवडणुकीत ...

विद्यमान नगरसेवक : वहिदा सौदागर

आताचे आरक्षण : अनुसूचित जाती

संतोष मिठारी, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : गेल्या निवडणुकीत बदललेल्या प्रभाग रचनेमध्ये बुद्ध गार्डन प्रभाग नव्याने तयार झाला. यंदा हा प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे अनेकांचा पत्ता कट झाला आहे. या प्रभागात यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सध्या सातजण इच्छुक आहेत. त्यामध्ये दोन माजी नगरसेवक आणि अन्य पाच नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे.

जवाहरनगर हौसिंग सोसायटी, जमादार कॉलनी, शास्त्रीनगर मैदान, विश्वकर्मा पार्क, अभिनव पार्क, सरनाईक कॉलनी, यादव कॉलनी, जवाहरनगर, सुभाषनगर परिसर, बुद्ध गार्डन परिसर, तोरणानगर हौसिंग सोसायटी, सरनाईक कॉलनी, तोरणानगर, शास्त्रीनगरचा काही भाग अशी या प्रभागाची रचना आहे. एका बाजूला उच्चभ्रू वसाहत आहे, तर दुसऱ्या बाजूला अगदी हातावर पोट असणाऱ्यांची वसाहत अशी प्रभागाची रचना आहे. सन २०१५ च्या निवडणुकीत वहिदा सौदागर (राष्ट्रवादी), उषा जाधव (ताराराणी आघाडी), जयश्री मंडलिक (कॉंग्रेस), विद्या पाटील-निरंकारी (शिवसेना), शोभा पाटील, रूपाली कदम, अलका कांबळे, सानिया महात, रिहाना इचलकरंजीकर (अपक्ष), शबाना पठाण (रासप) असे दहा उमेदवार मैदानात उतरले होते.

त्यामध्ये वहिदा सौदागर, मणिक मंडलिक, उषा जाधव, अलका कांबळे यांच्यात लढत रंगली. त्यात वहिदा सौदागर या ८४५ मतांनी विजयी झाल्या. गेल्या निवडणुकीत ४६१३ मतदान होते. त्यापैकी २९७९ मतदान झाले. यंदाच्या निवडणुकीसाठी या प्रभागातील आरक्षण बदलले असल्याने विद्यमान नगरसेवक सौदागर या लढणार नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष देईल त्या उमेदवारासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या प्रभागातील काही स्थानिक आणि अन्य भागांतील इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यात माजी नगरसेवक नंदकुमार गुजर हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. त्यांचा सुभाषनगर हा जुना प्रभाग होता. त्यातील ६० टक्के भाग बुद्ध गार्डनमध्ये येतो. सम्राटनगरमध्ये राहणारे माजी नगरसेवक जहॉंगीर पंडत हे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. पंडत यांनी यापूर्वी कॉमर्स कॉलेज प्रभागाचे प्रतिनिधित्व केले होते. माजी उपमहापौर हरिदास सोनवणे आणि माजी महापौर जयश्री सोनवणे यांचे मोठे चिरंजीव आणि उद्योजक प्रवीण सोनवणे हे कॉंग्रेसकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे राज्य प्रदेश प्रतिनिधी आणि पक्षात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत असणारे निरंजन कदम देखील राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी केली आहे. शास्त्रीनगरमधील शिवसैनिक रणजित मिणचेकर हे शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक आहेत. ते माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचे बंधू आहेत. बुद्ध गार्डन प्रभागामध्ये राहणारे प्रॉपर्टी कन्सल्टंट असलेले रणजित कांबळे हे भाजप- ताराराणी आघाडीकडून लढण्यास इच्छुक आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांच्या आई अलका या प्रभागामध्ये अपक्ष लढल्या. त्यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. वाय. पी. पोवारनगरमध्ये राहणारे आणि चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष रविकिरण गवळी हे भाजप- ताराराणी आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. ते जिल्हा परिषद अशोकराव माने यांचे भाचे आहेत. या इच्छुकांनी प्रभागातील आपला संपर्क वाढविला आहे. नगरसेवकपदाचा अऩुभव असलेले, राजकीय वारसा आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या इच्छुकांमुळे बुद्ध गार्डन प्रभागामध्ये यंदा लढत रंगणार आहे.

केलेली कामे

सरनाईक वसाहत (तिसरी, चौथी गल्ली), सरकवास कॉलनी, तोरणानगरमधील पाणीप्रश्न मार्गी लावला.

यादव कॉलनी, जमादार कॉलनी, सरनाईक वसाहत दुसरी गल्लीपर्यंतचे ड्रेनेजलाईनचे काम केले.

सरनाईक वसाहतीमधील पाच गल्लीमध्ये आमदार फंडातून कॉंक्रीटचे रस्ते केले.

पूर्ण प्रभागात एलईडी लाईट बसविली.

हुतात्मक स्मारक परिसरात ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी, एलईडी लाईट बसविली.

शिल्लक कामे

आर. आर. यादव कॉलनीतील नागरिकांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न

तोरणानगरमधील बहुउद्देशीय हॉल

तांत्रिक कारणामुळे सरनाईक वसाहतीतील तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या गल्लीतील ड्रेनेज लाईन राहिली.

प्रभागात ड्रेनेज लाईन, अंतर्गत रस्ते आणि कचरा उठावातील नियमिततेबाबतची काही कामे अजून शिल्लक आहेत.

प्रतिक्रिया

अमृत योजनेतून प्रभागात ८५ लाख रुपये खर्चून पाईपलाईनचे, तर दीड कोटींचे डांबरी रस्त्यांचे काम केले आहे. ५० लाखांचे क्रॉंकीटचे रस्ते केले आहेत. ४० लाख खर्चून गटर्स केली आहेत. ५५ लाखांच्या निधीतून प्रभागातील मुख्य रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. दहा ठिकाणी कूपनलिकांची व्यवस्था केली. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठाचा प्रश्न मार्गी लावला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मदतीने पायाभूत सुविधांची पूर्तता करून या प्रभागाला नवा चेहरा देण्याचे काम केले आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, आदींबाबतचे गेल्या अऩेक वर्षांपासूनचे प्रश्न मार्गी लावले आहेत.

-वहिदा सौदागर, नगरसेविका

गेल्या निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

वहिदा सौदागर (राष्ट्रवादी)-८५४

जयश्री मंडलिक (कॉंग्रेस)-६४५

उषा जाधव (ताराराणी आघाडी)-४९९

अलका कांबळे (अपक्ष)-४६५

विद्या पाटील-निरंकारी (शिवसेना)- १९४

फोटो (१८०२२०२१-कोल-बुध्दगार्डन प्रभाग) : कोल्हापुरातील बुद्ध गार्डन प्रभाग क्रमांक ६२ मध्ये ५० लाखांच्या निधीतून क्रॉंकीटचे अंतर्गत रस्ते करण्यात आले आहेत. (छाया : नसीर अत्तार)