तुरंबे : तळाशी, (ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायत निवडणूक दोन आघाडीत चुरशीची होत असून येथील प्रभाग क्रमांक दोन हा लक्षवेधी आहे. येथे शिवसेना आघाडीच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची आघाडी आहे. त्यामुळे आमदार प्रकाश आबिटकर समर्थक ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव ( गुरुजी ) विरुद्ध दोन्ही काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्यात थेट लढत आहे.
शिवसेनेच्या ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव (गुरुजी) करत आहेत, तर विरोधी श्री गहिनीनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे नेतृत्व यशवंत ऱ्हाटोळ, हंबीरराव जाधव, संभाजी जाधव, दिलीप खाडे, एम. बी. चव्हाण करत आहेत. तीन प्रभागात नऊ जागा आहेत. २०३१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीला पाच जागा, तर विरोधी आघाडीला चार जागा मिळाल्या होत्या.
यावेळी प्रभाग क्रमांक तीनमधून तीन जागा, प्रभाग क्रमांक दोन मधून दोन जागा सत्तारूढ गटात मिळाल्या, तर विरोधी गटाला प्रभाग क्रमांक एकमधून तीन जागा व प्रभाग क्रमांक दोनमधून एक जागा मिळाली होती. प्रभाग क्रमांक दोनमध्ये दोन्ही गटाच्या जागा निसटत्या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे हा प्रभाग दोन्ही गटासाठी सुरक्षेचा आणि लक्षवेधी आहे. या प्रभागात वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही आघाडीकडून होत आहे.
सत्तारूढ गटाचे उमेदवार सुनीता सुतार, साऊताई गाडेकर, रेखा राऊत, भास्कर जाधव, दिलीप भांदीगरे, संजीवनी सावरतकर, सदाशिव चव्हाण, वर्षाराणी खा,गणेश कांबळे तर विरोधी आघाडीचे उमेदवार वैशाली ऱ्हाटोळ, स्वाती जाधव, सुलोचना पाटील, तानाजी चव्हाण, चंद्रकांत जाधव, स्वाती पाडळकर, करण खाडे, सुजाता जाधव, एकनाथ कांबळे हे आहेत.