पोलिसातून मिळालेली महिती अशी, २२ मे रोजी संबंधित अल्पवयीन मुलगी शाळेत आपल्या आईवडिलांचे कोविड लसीचे रजिस्ट्रेशन आणण्यासाठी गेली होती. रजिस्ट्रेशन घेऊन शाळेतून जात असताना प्राथमिक शिक्षक विनोद कुमार चव्हाण याने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले. ही घटना मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितली. ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाला कपडे फाटेपर्यंत चोप दिला होता. पंधरा दिवस झाले तरी शिक्षकावर कारवाई पोलिसांनी केली नव्हती. जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी संबंधित शिक्षकाला निलंबित करा, असे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते. कोल्हापुरातील बाल कल्याण समितीने शाळा समितीच्या सदस्य व शाहूवाडी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती. शाळा समितीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याची नोटीस बजाविल्यावर मंगळवार, ८ जून रोजी रात्री उशिरा प्राथमिक शिक्षकावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
शिक्षकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:32 AM