भरावा लवकर न काढल्यास पाण्याच्या दाबाने कालव्यात धोका निर्माण होऊ शकतो. खुदाईचे पुढील काम व्यवस्थित न झाल्यास कामास विरोध करू, असा इशारा सरपंच सुनिता पाटील यांनी दिला आहे.
कोल्हापूर पाइपलाइनची खुदाई ही बेफिकीर झालेली असून, भराव हा अस्ताव्यस्त पडलेला आहे. या भागात पाऊस हा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे व चुकीच्या खुदाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांना व मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी सदरचा रस्त्यावर आलेला भराव महानगरपालिकेने काढून घेऊन रस्ता पूर्ववत वाहतुकीस खुला करावा तसेच उर्वरित पाइपलाइन खुदाईचे काम पाण्याचा प्रवाह बघून व्यवस्थित करावे, अशी मागणी समस्त ग्रामस्थांच्यावतीने सरपंच सुनिता पाटील व उपसरपंच बंडोपंत पाटील यांनी केली आहे.
फोटो ओळ- बुजवडे ता.राधानगरी येथे थेट पाइपलाइनचा कालव्यात आलेला मातीचा भराव.