गेला आठवडाभर पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीला महापूर आला. या महापुराचा वेग आणि तीव्रता ही नेहमीपेक्षा जास्त होती. अतिशय कमी वेळात महापुराने परिसराला कवेत घेतले. रविवारपासून पाणीपातळी कमी होण्यास सुरुवात झाली. पाणीपातळी जसजशी कमी होऊ लागली तसतसे या महापुराने झालेले नुकसान दिसू लागले. चिंचवड ते रुकडी पुलादरम्यानचा मजबूत रेल्वे मार्गही या फटक्यात उद्ध्वस्त झाला आहे. या मार्गावरील रेल्वे रुळाखाली असणारी खडी आणि मातीची भर अक्षरश: वाहून गेली. याठिकाणचे रेल्वे रुळ हे अंतराळी लोंबकळत आहेत.
फोटो : २६ गांधीनगर रेल्वे रुळ
चिंचवड ते रुकडी पुलादरम्यानची रेल्वे मार्गाखालील खडी आणि मातीची भर वाहून गेल्याने रेल्वे रूळ लोंबकळत आहे.