मराठी चित्रपट महामंडळ या नावाने ९ नोव्हेंबर १९६६ या दिवशी स्थापन झालेल्या या चित्रपट क्षेत्रातील शिखर संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले चित्रपती व्ही. शांताराम, चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, सुधीर फडके, विश्वास सरपोतदार, राम कदम, कमलाकर तोरणे, प्रभातकुमार यांच्यासह बाबूराव पेंढारकर, द. स. अंबपकर, अनंत माने, ग. रं. भिडे अशा अनेक थोर चित्रकर्मींमुळे महामंडळाचा वटवृक्ष महाराष्ट्राबाहेरही बहरू लागला. कोल्हापूरबरोबरच मुंबई, पुणे, नाशिक येथे शाखा विस्तार होताच झाला. त्याचे ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ’ असे नामकरण झाले. मूकपटापासून कृष्णधवल बोलपटापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीने बाळसे धरले. तंत्रज्ञानात क्रांती आली आणि चित्रपट रंगीत झाला, तसा मराठी चित्रपटसृष्टीचा आलेख उंचावत चालला. महामंडळाचे नाव सरकार दरबारीही सन्मानाने घेतले जाऊ लागले. चित्रपट निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान देण्याची योजना मंजूर केली. कलाकार-तंत्रज्ञ-कामगार-निर्माते यांच्या उत्तरार्धात त्यांना काही आर्थिक मदत व्हावी, ही संकल्पना पुढे आली आणि ‘वृद्ध कलाकार मानधन योजना’ पुढे आली आणि पुढे महाराष्ट्र शासनानेही ती टप्प्याटप्प्याने राबविण्यास सुरुवातही केली. मानधनाच्या रकमेत आणि लाभार्थ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली. निर्मात्यांचे अनुदान वाढल्याने महामंडळालाही वर्गणीरूपाने निधी मिळू लागला. जमा निधीतून आर्थिक मदत सुरू केल्याने आपुलकी वाढीस लागली. या मातृसंस्थेची अशी देदीप्यमान, उज्ज्वल वाटचाल आणि भविष्य असणारी, अशी कारकीर्द सुरू असताना, अशी कशी-कुठे माशी शिंकली? किरकोळ मतभेद-हेवेदावे-वादावादी असे अपवाद वगळता महामंडळाच्या आजवरच्या इतिहासात असे काळेकुट्ट ग्रहण का लागले, याचा आढावा गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे. पावित्र्य, सद्हेतूने चाललेली महामंडळाची वाटचाल गेल्या तीन-चार वर्षांपासून विचित्र (हॅलो २ वर)अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या द्विवर्षीय सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ झाला. आरोप-प्रत्यारोपाने महामंडळाची प्रचंड बदनामी झाली. त्यातच कोल्हापूरकर विरुद्ध मुंबईकर अशी एक नवीनच वादाची ठिणगी पडली आहे. त्यातच महामंडळाची निवडणूकही लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा वाद नेमका काय आहे, याबद्दल चित्रपट महामंडळाचे ‘अ’ वर्ग सभासद असलेले आणि महामंडळाच्या वाटचालीत योगदान दिलेले भालजी पेंढारकर यांचे स्वीय सहाय्यक अर्जुन नलावडे यांनी आपले मनोगत ‘लोकमत’कडे व्यक्त केले आहे.
चित्रपट महामंडळ संकटात...!
By admin | Published: March 15, 2016 12:59 AM