शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

चित्रपट महामंडळात सत्तांतर...

By admin | Published: April 27, 2016 1:25 AM

मेघराज राजेभोसले यांच्या पॅनेलचा एकतर्फी विजय

कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रनगरीला ऊर्जितावस्था देण्याची ग्वाही देत, नवीन चेहरे घेऊन निवडणुकीत उतरलेल्या मेघराज राजेभोसले, पुणे यांच्या ‘समर्थ पॅनेल’ने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या १४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्तांतर घडवत एकतर्फी विजय मिळवला. रात्री सव्वाबारा वाजेपर्यंत जाहीर झालेल्या १३ पैकी १२ जागा त्यांनी जिंकल्या होत्या. माजी अध्यक्ष विजय कोंडके, प्रसाद सुर्वे, विद्यमान संचालक मिलिंद अष्टेकर यांचा धक्कादायक पराभव झाला. शहरातील राम गणेश गडकरी सभागृहात (मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु झाली. निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील निकाल तब्बल बारातासानंतर जाहीर झाला. त्यामध्ये अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्यासह विद्यमान संचालक मिलिंद अष्टेकर, अनिल निकम, बाळकृष्ण बारामती यांना पराभवाचा धक्का बसला. संथगतीने झालेल्या मतमोजणीबद्दल उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.मतमोजणीचा एकूण कल पाहता व राजेभोसले यांच्या उमेदवारांना मिळालेली मते पाहता त्यांच्या पॅनेलने बहुमताकडे वाटचाल सुरु असल्याचे चित्र दिसत होते. महामंडळाच्या सन २०१६-२० या पंचवार्षिक निवडणुकीच्या १४ जागांसाठी क्रियाशील पॅनेल, शक्ती, समर्थ, कोंडके, फाळके, शाहू, संघर्ष, माय मराठी आणि परिवर्तन अशा नऊ पॅनेल आणि अपक्षांसह १२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. महामंडळाच्या इतिहासात यावेळी पहिल्यांदाच सर्वाधिक पॅनेल आणि सर्वाधिक उमेदवारांनी निवडणूक लढविली. निवडणुकीत रविवारी (दि. २४) दोन हजार १३५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ५४.६४ टक्के मतदान झाले. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई केंद्रांवरील मतपत्रिकांच्या एकत्रिकरणानंतर दुपारी बारा वाजता गटनिहाय चौदा टेबलांवर मतपत्रिकांची विभागणी करण्यात आली. दुपारी चार वाजता पहिल्या टप्प्यात रंगभूषा, ध्वनिरेखक, अभिनेत्री, निर्मिती व्यवस्था व व्यवस्थापकीय यंत्रणा, कामगार या पाच विभागांतील मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजता संबंधित प्रक्रिया पूर्ण झाली. त्यांना विजय पाटकर यांच्या क्रियाशील पॅनेलच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. या पाच विभागांत एकूण ६५९ मते बाद झाली. पहिल्या टप्प्यातील निकालात पाच जागांवर बाजी मारल्यानंतर समर्थ पॅनेलच्या समर्थकांनी मेघराज राजेभोसले आणि विजयी उमेदवारांसह मतमोजणी केंद्राबाहेर विजयाच्या घोषणा व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. रात्री साडेनऊनंतर उर्वरित नऊ विभागांतील मतमोजणीला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)विजय पाटकर यांच्या निकालावर आक्षेपक्रीयाशिल पॅनेलचे प्रमुख आणि विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांच्या विजयावर समर्थ पॅनेलने आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. समर्थ पॅनेलच्या राजेभोसले आणि समर्थकांनी जोरदार आक्षेप घेतला. शेवटी फेरमतमोजणी घेण्याचा निर्णय झाला. रात्री उशिरापर्यंत मोजणी सुरु होती.एका मतपत्रिकेवरून अर्धा तास गोंधळमहामंडळाच्या कार्यालयातून सकाळी साडेसात वाजता मतपेट्या मतमोजणीसाठी पोलिस संरक्षणात केंद्रावर आणण्यात आल्या. मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी उमेदवारांनी शिल्लक व अतिरिक्त मतपत्रिकांचा ताळेबंद सादर करा, अशी मागणी केली. त्यानुसार या पत्रिकांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पहिल्यांदा पुणे केंद्राची पेटी उघडण्यात आली. त्यातील ४७६ मतपत्रिकांमध्ये एक पत्रिका कमी पडली. त्यामुळे याठिकाणी असलेल्या उमेदवार, त्यांचे प्रतिनिधींनी निवडणूक समितीच्या सदस्यांशी वाद घातला. त्यावरून सुमारे अर्धा तास गोंधळ सुरू होता. बारकाईने पहिल्यांनंतर संबंधित पत्रिका दुसऱ्या एका मतपत्रिकेला चिकटल्याचे निदर्शनास आले. पत्रिका सापडल्यानंतर गोंधळ थांबला.दिग्गजांची घालमेलमतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून विजय पाटकर, मेघराज राजेभोसले, पूजा पवार, विजय कोंडके, माजी अध्यक्ष रामदास फुटाणे, ज्येष्ठ संचालक भालचंद्र कुलकर्णी आदी दिग्गज थांबून होते. मतमोजणीच्या प्रक्रिये दरम्यान त्यांची मोठी घालमेल सुरू होती. संथ गतीच्या प्रक्रियेने उमेदवार कंटाळलेनिवडणुकीत २ हजार १३५ मतदान झाले. मात्र, चौदा गटांच्या चौदा स्वतंत्र मतपत्रिका होत्या. त्यामुळे २९ हजार ८९० मतपत्रिका मॅन्युली मोजाव्या लागल्या. त्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेला विलंब लागला. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेली मतपत्रिकांची विभागणी दुपारी चारपर्यंत सुरू होती. मतमोजणीच्या संथ गतीबाबत पॅनेलप्रमुख आणि उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी प्रक्रियेची गती वाढावी या मागणीचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर निवडणूक समितीने नियोजनात बदल करून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित नऊ विभागांची एकाचवेळी मतमोजणी सुरू केली. दरम्यान, मतमोजणीवेळी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आक्षेप घेत होते. त्यातून निवडणूक समिती सदस्य आणि त्यांच्यात वारंवार वादावादीचे प्रकार घडले. ‘समर्थ’चे विजयी उमेदवार : वर्षा उसगावकर (अभिनेत्री)-५६६. चैताली डोंगरे (रंगभूषा) - ५९३. शरद चव्हाण (ध्वनीरेखक)- ६२१. संजय ठुबे (निर्मिती व्यवस्था व व्यवस्थापकीय यंत्रणा)- ५२०. रणजित (बाळा) जाधव (कामगार)- ७५८. मेघराज राजेभोसले (निर्माता गट)-६१४. पितांबर काळे (लेखक गट)-७१८. मधुकर देशपांडे (प्रदर्शन, वितरण गट)- ६४९. निकिता मोघे (संगीतनृत्य, पार्श्वगायन गट)- ६०६. धनाजी यमकर (स्थिर चलत छायाचित्रण)-५८९. विजय खोचीकर (संकलन गट). सतिश रणदिवे (दिग्दर्शक गट) क्रियाशील पॅनेलचे विजयी उमेदवार : सतीश बिडकर (कला प्रसिध्दी गट)