कोल्हापूर : येथील रोहित कांबळे दिग्दर्शित देशी या लघुपटाला फिल्मफेअरचा प्रेक्षक पसंती पुरस्कार जाहीर झाला. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रविवारी झालेल्या कार्यक्रमात अभिनेत्री सोनम कपूर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या लघुपटात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मुलीला शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी येणाºया अडचणींचा विषय मांडण्यात आला आहे. फिल्मफेअरच्या ‘शॉर्ट फिल्म अवॉर्डस् २०२०’च्या स्पर्धेत ‘सामाजिक जागृती’ या गटात देशी लघुपटाची निवड झाली होती.
त्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट फिक्शन चित्रपट, सर्वोत्कृष्ट नॉनफिक्शन चित्रपट आणि प्रेक्षक पसंती पुरस्कारासाठी या लघुपटाला नामांकन मिळाले होते. रविवारी झालेल्या सोहळ््यास फिल्म फेअर समितीचे सदस्य, दिग्दर्शक करण जोहर, रेमो फर्नांडिस, आर. माधवन, अभिनेत्री करीना कपूर, विद्या बालन आदी कलावंत उपस्थित होते.या लघुपटाने सांगलीत झालेल्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात सात पारितोषिके मिळविली आहेत. लघुपटाची निर्मिती राजेंद्रकुमार मोरे यांनी केली असून, अभिनेत्री वीणा जामकर व बालकलाकार गार्गी नाईक यांची प्रमुख भूमिका आहे. तसेच अन्य कलाकार व तंत्रज्ञ हे स्थानिक आहेत. छायांकन जयदीप निगवेकर, संगीतकार डॉ. जयभीम शिंदे, संकलन शेखर गुरव यांचे आहे.
या लघुपटासाठी कोल्हापूरकरांनी मोलाची साथ दिली. फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याने आमचा उत्साह अधिक वाढला असून, यापुढेही दर्जेदार लघुपट निर्माण करण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे. ती समर्थपणे पार पाडूरोहित कांबळे (दिग्दर्शक)
सलग तिसऱ्या वर्षी फिल्मफेअरची मोहोरफिल्म फेअर पुरस्कारात सलग तिसऱ्यांदा कोल्हापूरच्या लघुपटांनी बाजी मारली आहे. २०१७ साली उमेश बगाडे यांच्या ‘अनाहत’, २०१८ साली ‘सॉकरसिटी’ आणि आता २०१९ चा ‘देशी’ या तिसऱ्या लघुपटाला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे.