शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनिया गांधी कणखर स्वभावाच्या नेत्या, सर्वोच्च पद नाकारणे ही मोठी गोष्ट- पृथ्वीराज चव्हाण
2
एकनाथ शिंदे यांच्याशी भेटीनंतर भाजपाचे 'संकटमोचक' गिरीश महाजन म्हणाले- "आज मी मुद्दामून..."
3
“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
4
इंडिया आघाडीत मतभेद; अदानी-EVM सारख्या काँग्रेसच्या अजेंड्यावर विरोधकांमध्ये एकमत नाही
5
मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान
6
अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक, लातुरातील घटना
7
भिवंडीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 'आयटक'च्या शेकडो कामगारांचे धरणे आंदोलन
8
जळगावमध्ये पारोळानजीक भीषण अपघात; सुरत येथील मध्यमवयीन दाम्पत्य ठार
9
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
10
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका
11
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
12
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
13
बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
14
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
15
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
16
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
17
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
18
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
19
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?
20
“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले

कोल्हापूरच्या 'देशकरी' लघुपटाला फिल्मफेअर, अंतिम फेरीतील १० पैकी २ लघुपट कोल्हापूरचे

By संदीप आडनाईक | Published: December 02, 2024 11:49 AM

कोल्हापूर : कोल्हापुरातील 'देशकरी' या लघुपटाला रविवारी मुंबईत झालेल्या सोहळ्यात सामाजिक विषयासाठी प्रतिष्ठेचा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार मिळाला. छोट्या शेतकऱ्यांचे ...

कोल्हापूर : कोल्हापुरातील 'देशकरी' या लघुपटाला रविवारी मुंबईत झालेल्या सोहळ्यात सामाजिक विषयासाठी प्रतिष्ठेचा फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार मिळाला. छोट्या शेतकऱ्यांचे महत्व सांगणाऱ्या या लघुपटाने विशेष ज्युरी पुरस्कारही मिळवला आहे.कोल्हापुरातील संजय देव प्रॉडक्शनने हा लघुपट बनवलेला आहे. यातील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ कोल्हापुरातील आहेत. यापूर्वी या लघुपटाने ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले असून आणखीन १५ ठिकाणी नामांकन मिळालेले आहे.या लघुपटाची कथा, दिग्दर्शन आणि निर्माते संजय देव आहेत. वैभव कुलकर्णी यांनी पटकथा लिहिली असून विक्रम पाटील यांचे छायांकन आहे. ऐश्वर्य मालगावे यांचे संगीत आहे. यात मारुती माळी, श्रध्दा पवार, अनिकेत लाड, अमृता खांडेकर, प्रमोद कुलकर्णी, साधना माळी, आसावरी नागवेकर, ऐश्वर्य मालगावे, सुरेश पाटील, शिवाजी वडिंगेकर, राजू कुलकर्णी, बाळासाहेब बर्गे, दत्तात्रय बुटके, डी. के. पाटील यांच्यासह बालकलाकारांच्या भूमिका आहेत. या लघुपटाचे चित्रीकरण राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथे झाले आहे. या लघुपटासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले आहे.

दहा पैकी कोल्हापूरच्या दोघांना नामांकनकोल्हापूरच्याच स्वप्नील पाटील यांचा मधुबाला हा लघुपटही या स्पर्धेत होता. अंतिम फेरीत पोहोचलेल्या एकूण दहा लघुपटांपैकी दोन कोल्हापुरातील होते हे विशेष. 

पाचव्यांदा फिल्मफेअरची मोहोरफिल्म फेअर पुरस्कारात सलग पाचव्यांदा कोल्हापूरच्या कलावंतांनी बाजी मारली आहे. २०१८ साली उमेश बगाडे यांच्या ‘अनाहत’, २०१९ साली सचिन सूर्यवंशी यांचा ‘सॉकरसिटी’ आणि २०२० मध्ये रोहित कांबळे यांचा ‘देशी’, २०२२ मध्ये पुन्हा सचिन सुर्यवंशी यांचा 'वारसा' या माहितीपटाला आणि पुन्हा आता २०२४ मध्ये 'देशकरी' या पाचव्या लघुपटाला हा फिल्मफेअरचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFilmfare Awardफिल्मफेअर अवॉर्ड