शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

अंतिम याद्या ‘वेबसाईट’वर

By admin | Published: October 04, 2015 1:13 AM

छापील याद्यांबाबत संभ्रम : प्रशासनाचा सावळागोंधळ कायम

कोल्हापूर : शहरातील प्रभाग निश्चिती, आरक्षण टाकण्याबरोबरच प्रारूप याद्या तयार करताना प्रशासनाकडून झालेल्या गंभीर चुका लक्षात घेऊन, अंतिम मतदार याद्या तयार करताना तरी डोळ्यांत तेल घालून काम केले जाईल, असे वाटत असताना अद्याप निवडणूक यंत्रणेत सावळागोंधळ कायम असल्याचे शनिवारी पुन्हा स्पष्ट झाले. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची वेळ टळून गेली तरी त्या प्रसिद्ध केल्या गेल्या नाहीत. सायंकाळी काही प्रभागांच्या याद्या महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर टाकण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होत असून, त्यासाठीच्या ८१ प्रभागांतील अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत शनिवारपर्यंत होती; परंतु राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मुदतीत या याद्या पूर्ण करण्यात महानगरपालिका प्रशासनाला अपयश आले. प्रारूप याद्या करण्यात झालेल्या गंभीर चुका आणि त्या दुरुस्त करण्यासाठी दिलेला कमी कालावधी यांमुळे याद्यांची दुरुस्ती वेळेत झाली नाही. शुक्रवारी (दि. २) सकाळी सुरू झालेले याद्या दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळी आटोपले. त्यानंतर त्या आॅनलाईनद्वारे निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्या. आयोगाकडूनही याद्यांत पुन:पुन्हा चुका दाखविण्यात येत होत्या. त्यामुळे शनिवारचा दिवसही याद्या दुरुस्तीत खर्ची पडला. राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त सणस हे मुंबईत बसून, तर आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आदी वरिष्ठ अधिकारी हाताखालील पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांसोबत कोल्हापुरात बसून आॅनलाईन याद्या दुरुस्तीचे काम करीत राहिले. शुक्रवारची संपूर्ण रात्र याद्या दुरुस्तीमध्ये गेली. प्रारूप याद्या तयार करताना चुकाच एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अधिकाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यास याद्यांवर काम करावे लागणे ही महानगरपालिका प्रशासनाची नामुष्की असल्याची भावना अधिकाऱ्यांमध्ये तयार झाली आहे. शनिवारी हे काम नक्की कधी पूर्ण होणार, छापील याद्या कधी मिळणार आणि तयार होणाऱ्या पक्क्या याद्या निर्दोष असतील का, या प्रश्नाचे उत्तर शनिवारीही महापालिका अधिकाऱ्यांकडे नव्हते. कोणीही याबाबत स्पष्ट माहिती द्यायला तयार नव्हते. काही अधिकारी फक्त महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर याद्या प्रसिद्ध केल्या असल्याचे सांगत होते. याद्या छापण्यास देण्यात आल्या असून त्या रविवारी मिळतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे पक्क्या याद्यांबाबत संभ्रमावस्था कायम होती. दोन अधिकारी रुग्णालयात प्रारूप मतदार याद्या दुरुस्त करण्याच्या कामात गेल्या आठ-दहा दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी गुंतले आहेत. कामाचा व्याप आणि वेळेचे बंधन लक्षात घेऊन हे काम रात्रंदिवस सुरू आहे. कामाचा व्याप वाढल्यामुळे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांना त्रास होऊ लागल्याने तीन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, शनिवारी कनिष्ठ अभियंता निवास पोवार यांनाही प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती बरी असल्याचे सांगण्यात आले. दोन हजार कर्मचारी शहरात जवळपास ४०० ते ४२५ मतदान केंदे्र स्थापन केली जाणार आहेत. त्यांवर प्रत्येकी पाच याप्रमाणे दोन हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे सर्व कर्मचारी विविध सरकारी खात्यांतून घेण्यात आले आहेत.