शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
2
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
3
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
4
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
6
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
7
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
8
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
9
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
10
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
11
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
12
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
14
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
15
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
16
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
17
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
18
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
19
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

अखेर ‘दौलत’चा तिढा सुटला

By admin | Published: May 01, 2016 1:03 AM

तत्त्वत: मान्यता : ‘न्यूट्रीयन्टस’ला ४५ वर्षांसाठी भाड्याने देणार

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी साखर कारखाना न्यूट्रीयन्टस फु्रटस प्रा. लि. गोकाक या कंपनीस ४५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात तत्त्वत: मान्यता देण्यात आली. पंधरा दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या असून, गेली अनेक वर्षे बँकेच्या गळ्याभोवती अडकलेला ‘दौलत’चा तिढा अखेर सुटल्याने बँक संचालकांसह शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ‘दौलत’ भाडेतत्त्वावर घेण्यासाठी ‘न्यूट्रीयन्टस’ने ४५ व ६० वर्षांचे दोन प्रस्ताव दिले होते. त्यावर चर्चा होऊन जिल्हा बँक संचालकांनी ४५ वर्षांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यामध्ये जिल्हा बँकेची सगळी थकबाकी २०२३ पर्यंत कंपनी देणार आहे. कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी बॅँकेची काही रक्कम राखून ठेवण्याचाही यावेळी निर्णय घेण्यात आला. सिक्युअर्ड क्रेडिटर्स यांचे १०२ कोटी ३६ लाख ८५ हजार अधिक व्याज हे २०२२ अखेर मर्यादित राहणार आहे. कारखाना बंद असल्याने बँकेबरोबर चंदगड परिसरातील शेतकरी, कामगार अडचणीत सापडला होता. मध्यंतरी काही कंपन्यांनी चालविण्याची तयारी दाखवली, पण बऱ्याच घडामोडी झाल्या आणि त्यांनी नकार दिल्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कंपनी व बँकेचे चार्टर्ड अकौंटंट तसेच बँकेचे कायदा सल्लागार यांच्या अभिप्रायानुसार कंपनीस मान्यतापत्र देणार असल्याचेही त्यांनी सागिंतले. उपाध्यक्ष अप्पी पाटील, के. पी. पाटील, निवेदिता माने यांच्यासह संचालक उपस्थित होते. काय आहे प्रस्ताव -४बॅँकेचे ६७.५० कोटींपैकी ३३.७० कोटी मार्च २०१७ पर्यंत जमा करणे, पैकी १६.८० कोटी ताबा घेताना द्यावे लागणार. उर्वरित ५० टक्के रकमेचे व्याज व मुद्दलाचे सहा वार्षिक हप्ते करून त्यावर १२ टक्के व्याज अदा करण्यात येणार आहे. ४एसडीएफचे देणे ७२.५० लाख २०१७ पर्यंत, २०१८ ते २०२२ पर्यंत प्रतिवर्षी १ कोटी ७२ लाख १३ हजार रुपये १० टक्के व्याजासह अदा करायचे आहेत. ४बॅँकेने कारखान्याचे ना हरकत पत्र देणे. ४आवश्यक शासकीय मान्यता करारापूर्वी बँकेने देणेचे आहे. ४शासकीय देय रकमामध्ये काही सवलत मिळाली तर भाड्यातून ती वजा करण्यात येईल. ४कामगार देणेबाबत युनियन किंवा वैयक्तिक कामगारांशी चर्चा करून तडजोड केली जाईल. ४कारखाना ताळेबंद कंपनी लेखापरीक्षकाकडून निश्चित करून संबंधित सिक्युअर्ड देणी दिली जातील. ४करारातील दायित्वाखेरीज कंपनी कोणतेही दायित्व स्वीकारणार नाही.सप्टेंबरपर्यंत चाचणी हंगामकारखान्याचा गाळप परवाना कायम राहण्यासाठी सप्टेंबरपर्यंत चाचणी गळीत हंगाम घेणे बंधनकारक आहे. ‘न्यूट्रीयन्टस’ कंपनीने याची तयारी केल्याने परवान्याची काही अडचण येणार नसल्याचे बॅँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले.