शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
2
रेल्वे स्थानकावर मनोविकृताचा हल्ला, दोघांचा मृत्यू, दोन जखमी
3
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
4
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
5
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
6
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
7
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
8
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
9
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअड धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
10
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
11
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
12
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
13
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
14
पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये कोळसा खाणीत भीषण स्फोट; ७ मजुरांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
भोजपुरी सिनेमा, पवार कुटुंबाशी नातं, किल्ल्यांची दुरवस्था अन् बरंच काही! अश्विनी महांगडे करणार राजकारणात प्रवेश?
16
बाजीराव सिंघम लंकादहन करणार, मल्टीस्टारर सिनेमा Singham Again चा ट्रेलर रिलीज
17
Ola Electric Share Price : तेजीदरम्यान Ola Electric च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांवर डोकं धरण्याची वेळ, स्टॉक ₹९० च्या जवळ
18
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
19
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
20
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?

कोल्हापूरात शरद पवार गटाला धक्का! के पी पाटील यांची अजित पवार यांच्या गटाकडे वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 5:32 PM

निर्णयाची प्रतीक्षा संपली

गारगोटी- बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के.पी.पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री तर मंत्री हसन मुश्रीफ यांना उपमुख्यमंत्री करण्याचा मनोदय बोलून दाखवीत आम्ही अजितदादा पवार गटासोबत असल्याचे प्रथमच जाहीर केले. ते कोल्हापूर येथे शुक्रवारी झालेल्या नियोजन सभेत बोलत होते.अखेर माजी आमदार पाटील यांच्या पाठिंब्याचा गुलदस्ता खुला झाला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत माजी आमदार केपी पाटील राहिले आहेत.त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद सांभाळले आहे.दोन वेळा आमदार झाल्यानंतर ते राष्ट्रवादी सोबतच होते.पण राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार एक गट घेऊन बाहेर पडल्यानंतर राज्यात या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोची झाली आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांचे सख्य सुरवातीपासून अजित पवार यांच्यासोबत असल्याने त्यांनी तातडीने अजित पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले.पण भुदरगड तालुक्यातील माजी आमदार पाटील यांनी आपल्या गटाची भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती.ते गुप्तपणे मंत्री मुश्रीफ यांनी कागल येथील शासकीय विश्रामधामवर भेट घेतली होती.तर अजित पवार यांचीही भेट घेतल्याचे चर्चा गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सुरू होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर कोणत्या गटात जायचे याचे गेले दोन महिने निश्चित होत नव्हते.अखेर अजितदादांच्या दहा सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेचे नियोजन करण्यासाठी आज शुक्रवारी कोल्हापुरात नियोजन बैठक बोलवण्यात आली होती.त्या बैठकीत केपी पाटील यांनी आपण अजितदादांच्या गटात सामील होण्याचे नियोजनावर शिक्कामोर्तब केले.

 जुलै महिन्याच्या चार तारखेला माजी आमदार केपी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत जायचं की अजितदादांच्या सोबत जायचं? याचा निर्णय घ्यायचा होता.बैठकीचा सुर थोरल्या पवारां सोबत जाण्यासाठी उमटू लागला होता.त्यावेळी माजी आमदार केपी यांनी आपली भूमिका नंतर स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले.कदाचित त्यांना अजित पवार यांच्यासोबत जायचं असेल आणि बैठकीतील सुर शरद पवार यांच्याकडे असल्याने त्यांनी भूमिका स्पष्ट केली नसावी.

 मंत्री हसन मुश्रीफ यांची मैत्री आणि बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प शासन दरबारी अडकल्याने त्यांनी अजित पवार यांच्या सोबत जाण्याची भूमिका घेतली असेल.

आज कोल्हापुरात झालेल्या नियोजनाच्या बैठकीत अजितदादांच्या सोबत जाण्याचा आपला सुर एकदा आळवला.गेल्या आठवड्यात गारगोटी येथे आमदार रोहित पवार यांच्या बैठकीला गैरहजेरी आणि शरद पवार यांच्या कोल्हापूर सभेकडे पाठ केल्याने ते कोठे जाणार हे निश्चित होते.परंतु त्यांनी कोठेही जाहीरपणे वक्तव्य केले नव्हते.आजच्या बैठकीत निर्णय घेतल्याने आता केपी पाटील हे अजित पवार यांच्या गोटात सामील झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस