शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

अखेर पर्यायी शिवाजी पुलाला परवानगी-: संभाजीराजेंच्या हाती ‘पुरातत्त्व’चे मंजुरीचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 1:33 AM

भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाच्या मुंबई कार्यालयाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यामुळे पर्यायी शिवाजी पूल बांधकामातील प्रमुख अडथळा दूर होऊन पूल पूर्णत्वाचा मार्ग मोकळा झाला. खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी मुंबईत ‘पुरातत्त्व’चे प्रादेशिक संचालक डॉ. नंबीराजन यांची भेट घेऊन त्यांच्याकडून पुलासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळविले. त्यामुळे गेले काही दिवस पुलाच्या कामाच्या

ठळक मुद्दे मार्ग मोकळा

कोल्हापूर : भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाच्या मुंबई कार्यालयाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यामुळे पर्यायी शिवाजी पूल बांधकामातील प्रमुख अडथळा दूर होऊन पूल पूर्णत्वाचा मार्ग मोकळा झाला.खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी मुंबईत ‘पुरातत्त्व’चे प्रादेशिक संचालक डॉ. नंबीराजन यांची भेट घेऊन त्यांच्याकडून पुलासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळविले. त्यामुळे गेले काही दिवस पुलाच्या कामाच्या परवानगीबाबत निर्माण झालेली संभ्रमावस्था संपुष्टात आली.

पर्यायी शिवाजी पुलाचे काम ९५ टक्के पूर्णत्वात असताना भारतीय पुरातन सर्वेक्षण विभागाच्या मुंबई कार्यालयाने हे पुलाचे बांधकाम विनापरवाना असल्याने ते थांबवावे अन्यथा गुन्हा नोेंदवू, अशी नोटीस राष्टÑीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांना पाठविली होती. त्यामुळे पुलाच्या कामात प्रमुख अडथळा निर्माण झाला होता. त्यावरून राष्टÑीय महामार्ग विभाग आणि पुरातत्त्व विभाग यांच्यात परवानगीबाबत दावे-प्रतिदावे करण्यात आले होते.

हा पुलाचा विषय चिघळू नये यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी (दि. ६) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावून पुलाचे काम थांबविणार नसल्याची स्पष्टोक्ती केली; तसेच राष्टÑीय महामार्ग विभागाकडून पुलाच्या बांधकामासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मागणीपत्र घेतले. या पत्रासोबत प्राचीन ब्रह्मपुरी टेकडी परिसरातील एक एकर जागा हस्तांतर करण्याबाबतचे हमीपत्र मंगळवारीच खासदार संभाजीराजे यांच्याकडे पाठविले. या हमीपत्राच्या आधारे खासदार संभाजीराजे यांनी ‘पुरातत्त्व’च्या मुंबई (सायन) कार्यालयात जाऊन प्रादेशिक संचालक डॉ. नंबीराजन व स्मारक संचालक अलोनी यांच्याशी सविस्तर चर्चा करून हे हमीपत्र सादर केले. यावेळी संभाजीराजे यांनी ‘पुरातत्त्व’च्या प्रमुख उषा शर्मा व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी देसाई यांच्याशीही फोनवर चर्चा केली. चर्चेअंती नंबीराजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुलाच्या परवानगीचे पत्र संभाजीराजे यांच्याकडे सुपूर्द केले. 

ते परवानगी नव्हे, शिफारसपत्रदि. ६ जून २०१८ रोजी केंद्रीय स्मारके प्राधिकरणाने राष्टÑीय महामार्ग विभागास पुलाच्या बांधकामासाठी परवानगी दिल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे म्हणणे होते; पण ती परवानगी नसून ‘पुरातत्त्व’च्या सक्षम प्राधिकरणाने परवानगी देण्यास हरकत नसल्याचे शिफारसपत्र होते, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

एक एकर जागा देण्याचे हमीपत्रदि. ८ जून २०१८ रोजी पुलाच्या परवानगीबाबत राष्टÑीय महामार्ग विभागाने ‘पुरातत्त्व’च्या मुंबई कार्यालयास पत्र दिले; पण त्यांनी एक एकर जागेच्या हस्तांतरासाठी हे पत्र निर्णयाअभावी प्रलंबित ठेवले. ब्रह्मपुरी टेकडी परिसरात प्राचीन अवशेष सापडत होते. त्यामुळे त्या परिसरातील एक एकर जागा पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत ‘पुरातत्त्व’च्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी ६ जून २०१८ रोजी चर्चा झाली होती; पण त्यानंतर ती जागा हस्तांतरित न केल्याने ‘पुरातत्त्व’ने पर्यायी पुलाच्या बांधकामास नोटीस पाठवून गुन्हे नोंदविण्याचा इशारा दिला होता. त्या जागेबाबत हमीपत्र मंगळवारी मुंबई पुरातत्त्व विभागाला देण्यात आले.

 

पर्यायी शिवाजी पुलासाठी आजपर्यंत ‘पुरातत्त्व’ विभागाने परवानगी दिलेली नव्हती, केंद्रीय स्मारक प्राधिकरणाने परवानगीची शिफारस केली होती. त्याबाबत पाठपुरावा करून ‘पुरातत्त्व’ची परवानगी देण्यात आल्याचे पत्र घेतले आहे. त्यामुळे आता पूल पूर्ण होण्यास कोणताही अडथळा नाही.- संभाजीराजे, खासदार.

 

पुरातत्त्व विभागाच्या मागणीनुसार पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामासाठीचे ना-हरकत प्रमाणपत्र व प्राचीन ब्रह्मपुरी परिसरातील जागेचे हस्तांतर हमीपत्र मंगळवारी पुरातत्त्व विभागाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले. त्यामुळे पुलाच्या बांधकामासंदर्भातील अनिश्चितता संपली आहे.- दौलत देसाई, जिल्हाधिकारी------------

पर्यायी शिवाजी पुलाच्या कामास परवानगी देणारे पत्र मुंबईत ‘पुरातत्त्व’चे प्रादेशिक संचालकडॉ. नंबीराजन यांच्याकडून खासदार संभाजीराजे यांनी स्वीकारले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षा