शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

...अखेर शिष्यवृत्ती निधीचा प्रश्न मार्गी

By admin | Published: December 09, 2015 1:42 AM

‘लोकमत’चा दणका : निधी परत घेऊन पुन्हा दिला; अडचण दूर

कोल्हापूर : ‘शिष्यवृत्तीचे दीड कोटी एका सहीसाठी पडून’ या मथळ्याखाली शनिवारी ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेत पुणे येथील समाजकल्याण उपायुक्तांनी निधीचा प्रश्नी मार्गी लावला आहे. एक कोटी ४५ लाख रुपये पुन्हा खात्यावरून घेत आवश्यक त्या पत्रासह पहिल्या टप्प्यासाठी दोन कोटी रुपये शिष्यवृत्तीसाठी पुन्हा जमा केले आहेत. त्यामुळे यंदा आॅनलाईन शिष्यवृत्तीचा अर्ज भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून दरवर्षी इयत्ता पाचवी ते सातवीत शिकणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जाती आणि आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थिनीला वर्षाला ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. नववी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती म्हणून एक हजार रुपये मिळतात. शिष्यवृत्ती देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त (पुणे) एम. आर. वैद्य यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील खात्यावर जून महिन्यात निधी जमा केला होता. वैद्य यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली. त्यांना पदावरून दूर व्हावे लागले. त्यांनी निधी काढण्यासंबंधी आवश्यक लेखी आदेश दिला नाही. त्यांच्या जागी नूतन उपायुक्त म्हणून विजया पवार रूजू झाल्या. त्यानंतर त्यांनी शिष्यवृत्तीचा निधी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी सहीचा आदेश द्यावा, अशी विनंती येथील समाजकल्याण अधिकारी सुंदरसिंह वसावे यांच्याकडे केली. मात्र, तत्कालिन उपायुक्तांनी निधी खात्यावर जमा केला आहे. त्यामुळे मी माझ्या सहीचा आदेश देऊ शकत नाही, असे उत्तर वसावे यांना मिळाले होते. यासंबंधी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची त्वरित दखल घेत सोमवारी उपायुक्तांनी खात्यावर जमा केलेली रक्कम परत घेत त्याच दिवशी लेखी पत्रासह पुन्हा दोन कोटींचा निधी शिष्यवृत्तीसाठी खात्यावर जमा केला आहे. परिणामी आता शिष्यवृत्ती मिळण्यातील अडचण दूर झाली आहे.