शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कोल्हापूर जिल्ह्यात अखेर वळवाची हजेरी, उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहिसा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 6:03 PM

शिरोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना रात्री झालेल्या वळीव पावसाने थोडासा दिलासा दिला. हा दिलासा फार काळ टिकला नाही. केवळ वीस मिनिटे बरसलेल्या या पावसाने रात्रीची झोप मात्र नकोशी करून सोडली. पाऊस पडून गेल्यानंतर रात्री पुन्हा उकाड्याने शहरवासीय हैराण झाले.नवीन वर्षातील पहिल्या वळीव पावसाची शहरवासीय गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. दिवसभर कडाक्याचे ऊन, त्यामुळे होणाऱ्या अंगाची काहिलीने नागरिक भलतेच अस्वस्थ होते. दुपारच्या वेळी उन्हातून फिरणेदेखील मुश्कील होऊन गेले होते.गुरुवारी दिवसभर फारच गदगदत होते. अंगातून घामाच्या धारा लागलेल्या होत्या. सायंकाळी वळीव पाऊस पडेल असे वातावरण तयार झाले होते. रात्री थोडे वारे सुटले. त्यानंतर साडेदहा वाजण्याच्या सुमारास आकाश भरून आले. जोरदार वारे, विजांचा लखलखाट होऊ लागल्याने जोराचा पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. केवळ वीस मिनिटेच पाऊस झाला. या वर्षातील पहिलाच पाऊस असल्याने मातीचा सुगंध सुटला. पण, वीस मिनिटानंतर मात्र पाऊस थांबला. शहरवासीयांची जोरदार पावसाची अपेक्षा भंग पावली.कसबा वाळवे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसकसबा वाळवे : विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह आज रात्री १०:३० वाजेच्या सुमारास येथील परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू होती. हवेत गारवा पसरल्याने उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.राधानगरीत वादळी वाऱ्यासह मुसळदार पाऊसराधानगरी :  राधानगरीत गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. राधानगरीसह धरण परिसरात तासभर पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. ऊस पिकांना पाणी मिळाल्याने शेतकरी सुखावला. मुसळधार पावसामुळे राधानगरीसह परिसरातील वीजपुरवठा रात्री खंडित करण्यात आला होता.शिरोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसानगणेशवाडी : शिरोळ तालुक्यात बुधवारी दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने दमदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे भाजीपाला, केळी, उसाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. या पावसामुळे राजापूर, खिद्रापूर परिसरात भाजीपाला, उसाचे नुकसान झाले आहे. वांगी, टॉमटो या भाजीपाल्याची रोपे वादळी वाऱ्यामुळे उपटून पडली आहेत. केळीचे झाडेही तुटल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस