कोल्हापूर : अतिवृष्टीचा मोठा फटका राज्य मार्ग परिवहन महामंडळाला बसला आहे. कोल्हापूर आगाराच्या १३७९ फेऱ्या रद्द झाल्या असून १६ लाख ८० हजारांचा आर्थिक फटका बसला आहे. सुटीच्या दिवशी प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेले मध्यवर्ती बसस्थानक आणि रंकाळा बसस्थानक ओस पडले.एसटीच्या बारा आगारांना महापुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. दररोज विविध मार्गांवरील ७० हून अधिक फेऱ्या रद्द केल्या आहेत. रविवारी बारा आगारांतील १३७९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामध्ये ६४ हजार ४०१ किलोमीटरचा प्रवास थांबला. तर १६ लाख ८० हजार ९३४ रुपयांचे उत्पन्न बुडाले. केवळ कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या संभाजीनगर, गडहिंग्जल, गारगोटी मार्गावरील २०० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या. महापुराचा अंदाज घेऊन बहुतांशी मार्गावरील वाहतूक बंद झाली.शिरोली आणि तावडे हॉटेल परिसरात पुराचे पाणी आल्याने राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या एसटीच्या फेऱ्याही रद्द झाल्या. मध्यवर्ती बसस्थानकात दिवसभरात २०० तर रंकाळा बसस्थानकात २० ते २५ असे तुरळक प्रवासी होते. मध्यम आणि लांब पल्ल्याच्या एसटी रद्द केल्या.
आगारनिहाय रद्द फेऱ्या / बुडालेले उत्पन्नकोल्हापूर ११४ / १५२६५३संभाजीनगर २९२ / २६७२४८इचलकरंजी ५८ / ५५१५०गडहिंग्लज २३६ / २७६०९०गारगोटी २०१ / ३६०१००मलकापूर ९२ / १७१८७५चंदगड १२७ /८७३४४कुरुंदवाड १६४ / १३१८५०राधानगरी ४० / ७०२७४गगनबावडा ४० / ९०९३८आजरा १५ / १०९७२एकूण १३७९ / १६ लाख ८० हजार ९३४