शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

रेमडेसिविरच्या वापराबाबत रुग्णालयांकडून माहिती घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:23 AM

जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा प्रशासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची माहिती रुग्णालयांकडून घ्यावी. ...

जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची माहिती रुग्णालयांकडून घ्यावी. त्यामध्ये ज्या रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात आला, त्या रुग्णांचे नाव, संपर्क क्रमांकासह माहितीचा समावेश असावा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

पालकमंत्री पाटील यांनी रविवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन रेमडेसिविरचा पुरवठा, प्राणवायूची सद्यस्थिती, पी. एस. ए. ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प याबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते. यावेळी पी. एस. ए. ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याबाबत प्रयत्नशील राहावे, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

चौकट

जिल्ह्याला ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज व ॲग्रीकल्चर प्रणित पुणे प्लॅटफॉर्म कोविड रिस्पॉन्सच्या मिशन प्राणवायू प्रकल्पाव्दारे कोल्हापूर जिल्ह्याला ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले आहेत. यातील इचलकरंजी, चंदगड व राधानगरीसाठी प्रत्येकी १०, संजय घोडावत विद्यापीठ रुग्णालयासाठी २० असे वापरले जाणार आहेत. सीपीआरसाठी ४ आणि महापालिका रुग्णालयासाठी १ बायपॅकही मिळाले आहे.